Sanjay Raut Esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut: 'आर्थर रोड कारागृहात नीरव मोदीला खास बॅरेक, स्वतंत्र टीव्ही, बाथरूम अन्...', काय म्हणालेत संजय राऊत?

आर्थर रोड कारागृहात निरव मोदीला खास बॅरेक असल्याचं ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

आर्थर रोड कारागृहात निरव मोदीला खास बॅरेक असल्याचं ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी सामनाच्या दिवाळी अंकात कसाबच्या यार्डात हे सदर लिहलेले आहे, तुरुंगात अनुभवलेले अनुभव यामध्ये लिहले असून तुरुंगातील अनुभवांच्या आगामी पुस्तकात देखील याचा उल्लेख करण्यात आलेला आहे.

आर्थर रोड कारागृहात निरव मोदीला खास बॅरेक, त्याच्या बॅरेकच्या बाजूला मी होतो, असा दावा खासदार संजय राऊत यांनी त्यांच्या सामनाच्या दिवाळी अंकात लिहलेल्या लेखात दावा केला आहे.

आर्थर रोड कारागृहात ज्या बॅरेक मध्ये होतो त्याच्या बाजूला एक विशेष बॅरेक बनवण्यात आली होती. ही बॅरेक खास बनवून घेतली होती आणि त्याची रोज साफसफाई करुन व्हिडिओ चित्रीकरण केले जात होते. लंडनवरून एक पाहुणा आलाच तर त्याच्यासाठी ही वेगळी व्यवस्था असे सांगण्यात आलं होतं. त्या पाहुण्याचे नाव म्हणजे निरव मोदी, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

निरव मोदी सध्या लंडनच्या तुरुंगात आहे व आपल्याला मुंबईत पाठवू नये अशी मागणी त्याने कोर्टात केली कारण भारतातील तुरुंग अमानवी स्वरूपाच्या आहेत. त्यामध्ये कमालीची अस्वच्छता व त्यांना जणू छळ छावण्याचे स्वरूप आहे त्यामुळे मला लंडन तुरुंगातच ठेवा या याचिकेनंतर लंडन कोर्टाने अर्थ रोड तुरुंग प्रशासनाकडून येथील तुरुंग व्यवस्थेचा अहवाल मागवला.

त्यामध्ये मोदीसाठी निर्माण केलेल्या खास कोठडीचे चित्रण पाठवले ही कोठडी प्रशस्त आहे यामध्ये स्वतंत्र टीव्ही बाथरूम आहे, पण ही व्यवस्था इतर कैद्यासाठी नाही. आर्थर रोडला बनवलेल्या कोठडीच्या बाजूच्या यार्डात मी आहे, निरव मोदी आला तर आपल्याला कंपनी मिळत असे मला वाटले होते, असंही खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांनी सामनाच्या दिवाळी अंकात कसाबच्या यार्डात हे सदर लिहलेले आहे, तुरुंगात अनुभवलेले अनुभव यामध्ये लिहले असून तुरुंगातील अनुभवांच्या आगामी पुस्तकात देखील याचा उल्लेख करण्यात आलेला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Case: दोन वर्षांनंतर आरजी कर प्रकरणाला नवं वळण! पुन्हा चौकशी होणार; शुभेंदू अधिकारी सरकारचा मोठा निर्णय

Maratha Reservation: ‘कट्टर हिंदू आहोत, पण हिंदुत्व शिवरायांचे!’ मनोज जरांगे-पाटलांचा सरकारला थेट इशारा; समाज गप्प बसणार नाही’

Teacher Recruitment: शिक्षक मेगाभरतीत मोठा गोंधळ! पवित्र पोर्टल हँग, पसंतीक्रम लॉक करण्याची मुदत जवळ

Crop Insurance: पीक विम्याची मुदतवाढ मिळाली, पण संकेतस्थळच डाऊन; पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसमोर विमा संरक्षणाचे संकट

IND vs SL : साई सुदर्शनची माघार; निवड समितीला आठवला मुंबईचा शिलेदार, आता मज्जा येणार

SCROLL FOR NEXT