sameer Khan_Nawab Malik's son-in-law 
महाराष्ट्र बातम्या

Drugs Case : नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना जामीन मंजूर

नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोनं केली होती अटकेची कारवाई

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : ड्रग्ज केसमध्ये अटक करण्यात आलेल्या अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना विशेष एनडीपीएस कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्याचबरोबर सेलिब्रेटी मॅनेजर राहिला फर्निचरवाला आणि युकेचा रहिवासी करन सेजनानी यांनाही जामीन मंजूर झाला आहे. नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्युरोनं (NCB) या तिघांवर अटकेची कारवाई केली होती.

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात समीर खान यांची एनसीबीकडून दिवसभर चौकशी करुन त्यांना अटक करण्यात आली होती. वांद्रे पश्चिमेकडील एका कुरिअरमधून आलेला तब्बल २०० किलो गांजा पोलिसांकडून जप्त करण्यात आला होता, त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली होती. त्यानंतर त्यांना कोर्टासमोर हजर केल्यानंतर कोर्टानं समीर खान यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.

दरम्यान, जावई समीर खान यांच्या अटकेनंतर 14 जानेवारी रोजी केलेल्या ट्विटमध्ये नवाब मलिक यांनी म्हटलं होतं की, "कोणीही कायद्यापेक्षा वरचढ नाही आणि कोणत्याही भेदभावाशिवाय तो लागू केला गेला पाहिजे. कायदा योग्य मार्गाने जाईल आणि न्याय मिळू शकेल. मला न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. मला न्यायव्यवस्थेचा आदर आहे."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dombivali News : कल्याण–डोंबिवलीत काँग्रेसमध्ये मोठा भूकंप; जिल्हाध्यक्षांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे

Niphad Crime : अंध अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या पित्यास पंचवीस वर्षे सक्तमजुरी

Akola News : महापालिकेच्या मतदार यादीचा कार्यक्रम लांबणीवर; राज्य निवडणूक आयोगाकडून सुधारीत तारखा जाहीर

Murlidhar Mohol : महापालिकेची निवडणूक वेळेत होईल; मुरलीधर मोहोळ यांचा दावा

Latest Marathi News Live Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT