scholrship scheme sakal
महाराष्ट्र बातम्या

नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी खास योजना! ३० नोव्हेंबरपर्यंत करा अर्ज, विद्यार्थ्यांना मिळेल ९ ते १४,६०० रुपयांची शिष्यवृत्ती

राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलद्वारे इयत्ता नववी- दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना ‘प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती’ जाहीर करण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून दिव्यांग विद्यार्थ्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : दिव्यांग विद्यार्थ्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी केंद्र सरकारमार्फत राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलद्वारे इयत्ता नववी आणि दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना ‘प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती’ जाहीर करण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून दिव्यांग विद्यार्थ्यांना ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहेत.

राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलवरील (एनएसपी) सर्व योजनांसाठी लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण करणे बंधनकारक आहे. या प्री-मॅट्रिक योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांनी दिलेल्या कालावधीत ऑनलाइन अर्ज भरावेत, असे आवाहन शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी केले आहे. प्रत्येक अनुदानित शाळांनी त्यांच्याकडील शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास मदत करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

विद्यार्थी स्वतंत्रपणे देखील शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकणार आहेत. सर्वसामान्य कुटुंबातील दिव्यांग विद्यार्थ्यांनाही उच्च शिक्षण घेता यावे, आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात खंड पडू नये या हेतूने ही योजना सुरु करण्यात आली आहे.

शिष्यवृत्तीसाठी पात्रतेचे निकष...

  • - अनुदानित शाळांतील इयत्ता नववी व दहावीचे विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करू शकतात.

  • - शिष्यवृत्ती एका इयत्तेला एका शैक्षणिक वर्षासाठीच लागू राहणार आहे.

  • - विद्यार्थ्याचे दिव्यांगत्वाचे प्रमाण ४० टक्के किंवा त्याहून जास्त असावे.

  • - सक्षम अधिकाऱ्याचे दिव्यांगत्वाचे वैध प्रमाणपत्र कायद्यानुसार असावे.

  • - पालकांचे वार्षिक उत्पन्न दोन लाख ५० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे.

  • - पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना नऊ हजार ते १४ हजार ६०० रुपये इतकी शिष्यवृत्ती मिळते.

अर्ज करण्याच्या महत्त्वपूर्ण तारखा...

  • १) ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : 30 नोव्हेंबर

  • २) शाळास्तरावरील अर्ज पडताळणी : १५ डिसेंबर

  • ३) जिल्हास्तरावर अर्ज पडताळणी : ३० डिसेंबर

अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट...

  • १) www.scholarships.gov.in

  • २) www.depwd.gov.in

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP Candidates for Rajya Sabha: भाजपमध्ये ‘भाऊगर्दी’, दिल्लीत अंतिम निर्णय! राज्यसभेसाठी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब? ५ नावे चर्चेत

'जेलमध्ये स्मोकिंग झोन बनवला पाहिजे...' तिहार तरुंगातून बाहेर येताच राजपाल यादवची दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Viral News : भंगारवाल्याचा प्रामाणिकपणा ! सहा महिन्यांनी परत केले १५ लाखांचे दागिने, दु:खी कुटुंबाच्या डोळ्यांत आले आनंदाश्रू

Latest Marathi News Live Update : वाशिममध्ये बारावी परीक्षा सामूहिक कॉपी प्रकरणात 27 जणांवर गुन्हे दाखल

Sarkari Naukri 2026: सरकारी नोकरीची संधी! तीन नामांकित संस्थांकडून मोठी भरती जाहीर; अर्जाची संपूर्ण माहिती येथे वाचा

SCROLL FOR NEXT