महाराष्ट्र

आसनगाव-कसारादरम्यान स्पेशल पॉवर ब्लॉक 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मध्य रेल्वेवरील आसनगाव ते कसारा स्थानकांदरम्यान काही तांत्रिक कामे करण्यात येणार आहेत. रविवारी 10 नोव्हेंबर आणि 17 नोव्हेंबर या दोन दिवशी अप-डाऊन मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी वाहतुकीमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. 

ब्लॉकदरम्यान 11055 एलटीटी-गोरखपूर एक्‍स्प्रेस आसनगाव स्थानकात 12.20 ते दुपारी 1 वाजेपर्यंत, 12542 एलटीटी-गोरखपूर एक्‍स्प्रेस वाशिंद स्थानकात दु. 12.25 ते दुपारी 1 वाजेपर्यंत, 12869 सीएसएमटी-हावडा एक्‍स्प्रेस खडवली स्थानकात दु.12.26 ते दु.1 वाजेपर्यंत थांबविण्यात येणार आहे. 12812 हटिया-एलटीटी एक्‍स्प्रेस कसारा स्थानकात स.11.34 ते दु.1 वाजेपर्यंत थांबविण्यात येणार असल्यामुळे एलटीटीला दुपारी 3 वाजता पोहोचणार आहे.

11094 वाराणसी-सीएसएमटी महानगरी एक्‍स्प्रेस इगतपुरी स्थानकात स.11 ते दु.12.30 वाजेपर्यंत थांबवून दादर स्थानकापर्यंतच धावणार आहे. तर 12294 अलाहाबाद-एलटीटी दुरान्तो एक्‍स्प्रेस आणि 12142 पालटलीपुत्र-एलटीटी एक्‍स्प्रेस एलटीटीला आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 5 ते 15 मिनिटे उशिराने पोहोचणार आहेत. 12117-19 एलटीटी-मनमाड-एलटीटी एक्‍स्प्रेस रद्द करण्यात आली आहे. 

उपनगरीय मार्गावरील सीएसएमटी-कसारा ही स.9.41 ची लोकल आसनगावपर्यंतच धावणार आहे, तर कसारा-सीएसएमटी ही स.11.12 ची लोकल आसनगाव स्थानकातून स.11.49 ला चालविण्यात येणार आहे. कसारा-सीएसएमटी दु.12.19 ची लोकल रद्द केलेली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी आसनगाव-सीएसएमटी स्पेशल लोकल दु.12.27 वाजता सुटणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar : ''माझ्यासोबत राहून मला धोका देणाऱ्यांना सोडणार नाही'', नितीश कुमारांची धमकी कुणाला?

Aditya Roy Kapur And Ananya Panday: आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडेचा ब्रेकअप; जवळच्या मित्रानं सांगूनच टाकलं

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT