exam sakal media
महाराष्ट्र बातम्या

१० वी, १२ वीच्या परीक्षा पुढे ढकलणार ? शिक्षण मंडळ घेणार आढावा

संजीव भागवत

मुंबई : राज्यात मागील आठवड्यापासून कोरोनाची रूग्णसंख्या (corona patients) झपाट्याने वाढत असल्याने मार्च-एप्रिल दरम्यान राज्य शिक्षण मंडळाच्या (Maharashtra education board) होणाऱ्या लेखी परीक्षासाठी (written exam) लवकरच आढावा घेतला जाणार आहे. शिक्षण मंडळाकडून या परीक्षा ऑफलाईन (offline) पद्धतीने घेतल्या जाणारी असून त्यासाठीचे वेळापत्रकही मागील महिन्यापूर्वी जाहीर करण्यात आले आहे. (ssc and hsc exams postponed possibilities as education board about to review)

मुंबई, ठाणे आदी महापालिका क्षेत्रात दहावी आणि बारावीचे वर्ग आणि शाळा सुरू असल्या तरी येत्या काही दिवसांत कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे परिस्थिती बिघडण्याची भीती मंडळातील अधिकाऱ्यांनाही सतावत आहे. त्यामुळेच येत्या काही दिवसांत मंडळाच्या नऊ विभागीय मंडळातील परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. मात्र या परीक्षांमध्ये बदल करण्याचा कोणताही विचार सध्या मंडळापुढे नसल्याचे मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ४ मार्चपासून बारावीची तर १५ मार्चपासून दहावीची लेखी परीक्षा होणार आहेत. तर २५ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत दहावीच्या आणि १४ फेब्रुवारी ते ३ मार्च या कालावधीपर्यंत तोंडी व प्रात्यक्षिक परीक्षांची सुरूवात होणार आहे. राज्यातील शाळा-महाविद्यालयांमध्ये या परीक्षेच्या सदंर्भात तयारीही सुरू असून अनेक शाळांनी आपला अभ्यासक्रम पूर्ण करून विद्यार्थ्यांना वाचनासाठी अधिकचा वेळ देण्यासाठीचे नियोजन केले आहे. मात्र याच काळात कोरोनाचा कहर वाढत असल्याने शिक्षण मंडळाकडून राज्यातील नऊ मंडळातील परिस्थितीचा आढावा घेतला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT