SSC HSC Board esakal
महाराष्ट्र बातम्या

SSC HSC : दहावी-बारावीची ग्रेड पद्धत होणार बंद

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्य अभ्यासक्रम आराखडा मसुदा जाहीर केला असून यात दहावी, बारावीच्या परीक्षांमध्ये मोठे बदल सुचविले आहेत.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य अभ्यासक्रम आराखडा तयार करण्यात आला असून या आराखड्यामध्ये दहावी आणि बारावीसाठी असलेली ग्रेड म्हणजेच श्रेणी पद्धत बंद केली जाणार आहे. यासंदर्भात या नवीन आराखड्यामध्ये शिफारस करण्यात आली आहे. यासोबतच भारतीय ज्ञान परंपरा आणि त्या संदर्भातील अभ्यासक्रमाच्या माध्यमातून अनेक धार्मिक विषय आणले गेले आहेत. त्याला येत्या काळात विरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञान परंपरेला खूप मोठ्या प्रमाणात महत्त्व देण्यात आले आहे. त्यासोबतच कौशल्यविषयक शिक्षण आणि अनुभवा आधारित शिक्षणावर ही भर देण्यात आला आहे. प्राथमिक माध्यमिक स्तरावरील शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना कला शिक्षण, शारीरिक शिक्षण आणि व्यवसाय शिक्षण देण्यावर देखील भर देण्यात आला आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्य अभ्यासक्रम आराखडा मसुदा जाहीर केला असून यात दहावी, बारावीच्या परीक्षांमध्ये मोठे बदल सुचविले आहेत. आतापर्यंत कला शिक्षण, शारीरिक शिक्षण या विषयांचे श्रेणी पद्धतीने होणारे मूल्यमापन श्रेणी पद्धतीने होत होते.

पण आता व्यवसाय शिक्षण, कला शिक्षण, शारिरिक शिक्षणासाठी ७५ टक्के मूल्यमापन हे प्रात्यक्षिक परीक्षांवर तर २५ टक्के मूल्यमापन लेखी परीक्षेवर आधारित असणार आहे. या परीक्षांसाठी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उच्च गुणवत्तेच्या प्रणालीची आखणी व अंमलबजावणी करावी तसेच ही प्रणाली शालेय व्यवस्थापनापासून स्वतंत्र असावी, अशी सूचना मुसद्यात केली आहे.

राज्य अभ्यासक्रम आराखड्यामध्ये करण्यात आलेल्या शिफारशीनुसार दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक आणि लेखी परीक्षा विद्यार्थ्यांना द्यावी लागणार आहे. श्रेणी विषय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने गौण मानले जातात. त्यामुळे या विषयांचे मूल्यांकन श्रेणी पद्धतीने न करता गुणदान पद्धतीने करण्यात यावे, असे मसुद्यात म्हटले आहे. हा प्रास्तावित मसुदा असून नागरिकांकडून आलेल्या अभिप्रायांचा विचार करून मसुदा अंतिम करण्यात येणार आहे.

मनाचे श्लोक, भगवद्‌गीतेची ओळख

राज्य अभ्यासक्रम आराखड्याच्या मसुद्यात भारतीय ज्ञान परंपरा आणि त्या आधारित अभ्यासक्रमावर भर देण्यात आला आहे. तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धा तर नववी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी भगवद्गीतेतील १२ वा अध्याय पाठ करण्याची स्पर्धा घेण्यात यावी, अशी शिफारस करण्यात आली आहे. तसेच आराखड्यात पूर्व प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणावर भर दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

SCROLL FOR NEXT