exam exam
महाराष्ट्र बातम्या

दहावीच्या मूल्यांकनात आता तांत्रिक अडचण, आजपासून लिंक सुरू

नववी, दहावीच्या आधारावर दहावीचा निकाल लावण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले होते

संदीप लांडगे

औरंगाबाद: कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यामुळे नववी, दहावीतील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात येणार आहे. मूल्यांकनाची लिंक २१ जूनला सुरू होणार होती. मात्र, वेबसाईटला आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे बुधवारपासून लिंक सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती बोर्डातील अधिकाऱ्यांनी दिली. दरवर्षी मार्च-एप्रिलमध्ये घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा यंदा कोरोनामुळे रद्द करण्यात आल्या. यंदा परीक्षेसाठी औरंगाबाद विभागातून पावणेदोन लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. विभागीय शिक्षण मंडळाच्यावतीने परीक्षेसाठीची संपूर्ण तयारीदेखील करण्यात आली होती. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला.

दरम्यान दहावीची परीक्षा रद्द झाल्याने मूल्यांकन कसे होईल? याबाबत चर्चा सुरू होती. त्यावर नववी, दहावीच्या आधारावर दहावीचा निकाल लावण्यात येणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले होते. नववीचे ५० टक्के; तर दहावीचे ३० टक्के प्रथम सत्र सराव, २० टक्के प्रात्याक्षिक, तोंडी असे मिळून ८० टक्क्यांपर्यंत मूल्यांकन शिक्षकांना करायचे आहेत. मात्र ही पद्धत संपूर्ण सूचना न वाचल्याने शिक्षकांना अद्याप समजलीच नाही. त्यामुळे शिक्षण मंडळात वारंवार फोन करून विचारणा केली जात आहे. तर या मूल्यांकनासाठीची लिंक सोमवारी (ता.२१) सुरू होणार होती. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे लिंक सुरू झाली नाही. बुधवारी ती सुरू होणार असल्याचे बोर्डातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

मागील निकालांबाबतही प्रश्नचिन्ह-
उत्तरपत्रिकांची तपासणी करून निकालाची तयारी करणे सोपे होते. आता पुन्हा नववी आणि दहावीचे मूल्यांकन करून निकाल तयार करणे यात वेळ द्यावा लागणार आहे. गेल्या वर्षभरात शाळा सुरू झाली नाही. ऑनलाइन क्लासही किती जणांपर्यंत पोचलेत याबाबतही शंकाच आहे. मागील वर्षीपासून कोरोनामुळे शाळा बंद आहेत. त्यामुळे आधीचेच गुणपत्रक मुलांना मिळालेले नाही. यामुळेदेखील मूल्यांकन करणे अडचणीचे ठरत असल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aditi Tatkare Mumbai Goa highway : मुंबई -गोवा महामार्गावरील टोल वसुलीला अदिती तटकरेंचा तीव्र विरोध, नितीन गडकरींची घेणार भेट

अश्या प्रकारच्या जल्लोष करण्यावर थेट बंदी घाला! अंबाती रायडू आयपीएलमधील 'त्या' ट्रेंडवर प्रचंड संतापला

सकाळी वडिलांकडे मिसळपाव मागितला, खाल्ल्यानंतर ३३ वर्षीय तरुणीनं नवव्या मजल्यावरून मारली उडी

OBC Reservation: ओबीसी आरक्षणासाठी मोठा आवाज; प्रा. लक्ष्मण हाके यांचे राज्य सरकारला आवाहन, समाजाच्या हक्कांसाठी संघर्षाची हाक!

Pandharpur Darshan: पंढरपुरात विठ्ठल दर्शनासाठी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार; ऑडिओ क्लिप व्हायरल, अधिक मास सुरू होताच पंढरपुरात खळबळ..

SCROLL FOR NEXT