महाराष्ट्र बातम्या

SSC Result 2024 : दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने मित्रांनी काढली 'जेसीबी'वरुन मिरवणूक; मार्क म्हणाल तर...

सकाळ वृत्तसेवा

उरणः चिरनेर गावातील सार्थक अनंता नारंगीकर हा मित्र बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने गावातील मित्रांनी चक्क ढोलताशांच्या गजरात वाजत गाजत मोटारसायकल व जेसीबी वरुन मिरवणूक काढली आहे.

सध्याची तरुण पिढी ही अभ्यासाची कास न धरता मोबाईल मध्ये आपलं लक्ष केंद्रित करून आपला वेळ, आयुष्य वाया घालवीत आहे.त्यात चिरनेर गावातील सार्थक अनंता नारंगीकर हा तरुण शाळेतील अभ्यासक्रमात लक्ष न देता मोबाईल व इतर बाबींकडे लक्ष केंद्रित करत होता.त्यामुळे तो दहावीच्या परीक्षेत नापास होणार असे त्यांच्याबद्दल मित्रांमध्ये तर्कवितर्क लावण्यात येत होते.

परंतु सार्थकने त्यांच्या मित्रांना वचन आणि विश्वास दिले की मी दहावीची परीक्षा उत्तीर्ण होणार आहे. नुकताच दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्यात सार्थक नारंगीकर या विद्यार्थ्यांला दहावीच्या परीक्षेत 50.80 टक्के गुण मिळवून तो दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाला.

ही आनंदाची बातमी गावातील मित्रांना कळताच मित्रांनी ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत सार्थक नारंगीकर ची मोटारसायकल व जेसीबीवरुन मिरवणूक काढली आहे. यावेळी गावातील अनेक नागरीकांनी सार्थक चे अभिनंदन केले आहे.

विभागानुसार निकाल

  • पुणे : २,६२,९४९ : २,५३,६०० : ९६.४४ टक्के

  • नागपूर : १,४९,८९७ :  १,४२,००५ : ९४.७३ टक्के

  • औरंगाबाद : १,८२,८४४ : १,७४,०५६ : ९५.१९ टक्के

  • मुंबई : ३,३९,२६९ : ३,२५,१४२: ९५.१९ टक्के

  • कोल्हापूर : १,२७,८१८ : १,२४,५६७ : ९७.४५ टक्के

  • अमरावती : १,५९,६८४: १,५२,६३१: ९५.५८ टक्के

  • नाशिक : १,९५,५८२ : १,८६,३५२ : ९५.२८टक्के

  • लातूर : १,०४,५०३ : ९९,५१७ : ९५.२७ टक्के

  • कोकण : २६,७८०: २६,५१७ : ९९.०१टक्के

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT