ST bank Election 
महाराष्ट्र बातम्या

ST bank Election : चुरस वाढली! सदावर्तेंच्या पॅनलला शिंदे गट, भाजपसह 6 पॅनलचे आव्हान

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एसटी कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीत यावर्षी चांगलीच चुरस वाढली आहे. गेल्या ७० वर्षात पहिल्यांदा एसटी बँकेची सत्ता काबीज करण्यासाठी निवडणुकीत ७ पॅनल एकमेकांच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरले आहे. सध्या एसटीची मान्यता प्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेची बँकेत एकहाती सत्ता आहे.

याविरोधात आता भाजपा आमदार गोपीचंद पडळकर, ॲड.गुणरत्न सदावर्ते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे किरण पावसकर आणि अपक्ष उमेदवार, एसटी कर्मचारी वर्कर्स काँग्रेस (इंटक) आणि सेना काँग्रेस आणि कास्ट्राईब संघटनेच्या युतीचे एक पॅनल मिळून अशा एकूण ७ पॅनलमुळे निवडणुकीत चांगलीच चुरस वाढली आहे.

एसटी बँकेचे सुमारे ४ हजार कोटींपेक्षा जास्त उलाढाल असून, राज्यातील सुमारे १ लाख एसटी कर्मचारी या बँकेचे सभासद आहे. त्यामुळे बँकेची दिवसेंदिवस उलाढाल वाढत असून, मालमत्ता सुद्धा आहेत. त्यामुळे बँकेतील विविध प्रवर्गाच्या १९ संचालकांच्या निवडणुकीला प्रचंड महत्व प्राप्त झाले आहे.

गेल्या निवडणुकीत महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटनेने आपले १९ संचालक एकहाती निवडून आणले होते. मात्र, कोरोणा महामारी, त्यानंतर एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याचा संपाचा लढा आणि एसटी महामंडळात नव्याने आलेल्या एसटी कर्मचारी संघटनांमुळे बँकेच्या निवडणुकीत रंगत वाढली आहे.

यामध्ये सर्वसाधारण १४, महिला प्रतिनिधी २, अनुसूचित जाती जमाती १, इतर मागास प्रतिनिधी १, भटक्या विमुक्त जाती जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी १ अशा एकूण एसटी बँकेच्या १९ संचालक पदासाठी ही निवडणूक होत आहे.

या प्रवर्गामध्ये सर्वसाधारण संघात ९८, अनुसूचित जाती जमाती राखीव मतदार संघात ११, इतर मागासवर्गीय राखीव मतदार संघात ८, विमुक्त जाती, भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग राखीव संघात १२ तर महिला राखीव मतदार संघात १४ असे एकूण तब्बल १४३ उमेदवार १९ संचालक पदावर निवडून येण्यासाठी रिंगणात असल्याचे एसटी बँक प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India CPI Inflation: देशात पुन्हा महागाईचा भडका! दुष्काळ अन् वाढत्या महागाईत ग्रामीण भागाची दुहेरी होरपळ

IND vs WI: विंडिजच्या दोन खेळाडूंवर ICC ची कारवाई; भारताविरुद्ध T20I मालिका सुरू असतानाच नेमकं काय घडलं?

Rahul Gandhi: राहुल गांधींचा मोठा दावा! म्हणाले, ''मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचे मला मेसेज येतात..''

Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर कारखान्याच्या निवडणूकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलची मुसंडी.... विजयाच्या दिशेने घौडदौड.....; पुरुषोत्तम जगताप यांना दारुण पराभव

Sri Lanka Politics: आधी मुलगा, आता पत्नी अडचणीत; महिंदा राजपक्षे ICU मध्ये, श्रीलंकेत सध्या काय घडतंय?

SCROLL FOR NEXT