ST BUS  Sakal
महाराष्ट्र बातम्या

ST Bus : एसटीच्या अधिकृत थांब्यावर प्रवासी सुविधांपासून वंचित

एसटी महामंडळाच्या अधिकृत खासगी हॉटेल थांब्यावर प्रवाशांना ३० रुपयात देण्यात येणाऱ्या सुविधा मुळात नसल्याचे पुढे आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - एसटी महामंडळाच्या अधिकृत खासगी हॉटेल थांब्यावर प्रवाशांना ३० रुपयात देण्यात येणाऱ्या सुविधा मुळात नसल्याचे पुढे आले आहे. त्यावरून राज्यभरातील अशा थांब्यांच्या ठिकाणी हॉटेल चालकाने एसटी प्रवाशांना ३० रुपयात चहा-नाश्ता व नाथजल पाणी बाटली उपलब्धतेबाबत तपासणीचे आदेश दिले आहे.

यासंदर्भात नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात लोकप्रतीधींकडून प्रश्न विचारण्यात आल्यानंतर एसटी महामंडळ प्रशासन कामाला लागले आहे. पणन व नियोजन विभागाच्या महाव्यवस्थापकांनी लेखी आदेश काढून यासंदर्भात राज्यातील सर्व विभाग नियंत्रकांना चौकशी करून तपासणी अहवाल मागितला आहे.

जर अधिकृत हॉटेल चालकांकडून एसटी महामंडळाच्या नियमांची पायमल्ली होत असल्यास आणि अशा स्वरुपाची प्रवाशी तक्रार असल्यास त्यांच्यावर तात्काळ प्रभावाने कारवाई करण्याच्या सूचना यामध्ये दिल्या आहे. शिवाय केलेल्या कारवाईबाबतचा अहवाल प्रत्येक महिन्याच्या अखेर मुंबई सेंट्रल येथील मुख्यालयाला पाठवण्याच्या सूचना सुद्धा यामध्ये दिल्या आहे.

या कारवाई संदर्भात अधिकाऱ्यांना पुन्हा सूचना किंवा कोणतेही स्मरणपत्र देण्यात येणार नसल्याने भविष्यामध्ये या प्रकरणी तक्रार उद्भल्यास त्यास संबंधीत विभाग नियंत्रक जबाबदार धरण्यात येईल अशी तंबीच या आदेशात दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood Indian Missing : नेपाळमध्ये शेकडो भारतीय पर्यटक बेपत्ता, महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाइन सुरू, असा करा संपर्क

Gokul Election 2026 : 'गोकुळ'च्या सत्ताकारणाचा काउंटडाऊन सुरू! अंतिम मतदार यादीची तारीख ठरली; उमेदवारी अर्जाचा मुहूर्तही निश्चित, 410 संस्थांच्या हरकतीवर सुनावणी

Pune News: आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाची झिरवळांकडून थट्टा? ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा’ म्हणताच विद्यार्थ्यांनी सुनावलं

Hydrogen Train: जगातील सर्वांत शक्तिशाली हायड्रोजन रेल्वेचा नवा विक्रम; भारताच्या पहिल्या ट्रेनने ६ हजार किमी प्रवास पूर्ण

Marathi News Live Updates : कात्रज घाटात भाजपशी संबंधित निवडणूक साहित्याचा खच; स्वच्छता ग्रुपकडून कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT