ST Bus News sakal
महाराष्ट्र बातम्या

ST Bus News: दोन हजार विद्यार्थी करणार ‘लालपरी’ने मोफत प्रवास!

Marathwada Update: या वयोगटातील विद्यार्थिनींना १०० टक्के सवलत दिली जात आहे.

चंद्रकांत तारू

Paithan: ग्रामीण विद्यार्थ्यांना एक दिवस शाळा बुडवून एसटीचा मासिक पास काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या आगारात खेट्या माराव्या लागू नयेत, यासाठी शासनाने विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

या सुविधेचा लाभ आतापर्यंत पैठण तालुक्यातील एकूण दोन हजार विद्यार्थी व विद्यार्थिनींना झाला आहे. तसेच, हा एसटी बसचा मोफत पास शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे. त्यात ८०० विद्यार्थी व १२०० विद्यार्थिनींचा समावेश आहे.

राज्य शासनाच्या मानव विकास योजनेंतर्गत ‘अहिल्याबाई होळकर मोफत पास’द्वारे सध्या ग्रामीण भागातील पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना शाळेत जाण्यासाठी एसटीचा मोफत पास दिला जात आहे. या वयोगटातील विद्यार्थिनींना १०० टक्के सवलत दिली जात आहे.

त्याचप्रमाणे इतर विद्यार्थ्यांना घरापासून शाळेत जाण्यासाठी ३३ टक्के रक्कम भरून मासिक पास घेता देण्यात येत आहे. यासाठी पैठण तालुक्यातील प्रत्येक गावातील शाळेच्या मुख्याध्यापकांनी राज्य परिवहन महामंडळाच्या आगारप्रमुखांना यादी पाठवावी लागते. यादी प्राप्त झाल्यानंतर विद्यार्थ्यांना संबंधित योजनेनुसार मासिक किंवा तिमाही पास उपलब्ध करून देण्यात येत आहे. योजनेतून एसटीचा पास घेणाऱ्या विद्यार्थ्यांची किमान ७५ टक्के उपस्थिती असल्याचे प्रमाणपत्र राज्य परिवहन महामंडळास देणे आवश्यक आहे.

मुख्याध्यापकांकडून अर्ज केल्यानंतर तत्काळ राज्य परिवहन महामंडळाच्या स्थानिक कार्यालयाकडून त्या शाळेतील विद्यार्थ्यांना पास उपलब्ध करून दिला जात आहे. अहिल्याबाई होळकर मोफत पास योजनेंतर्गत पैठण तालुक्यातील १२०० विद्यार्थिनींना मोफत पास वितरित करण्यात आले.

तसेच, इतर ८०० विद्यार्थ्यांना मासिक पास देण्यात आला आहे. अद्यापही काही विद्यार्थ्यांना पास देणे सुरू आहे. पाचवी ते बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या एकूण १२०० विद्यार्थिनींना मोफत पास दिला आहे, असे आगारप्रमुख गजानन मडके यांनी‌ नमूद केले.पाससाठी माराव्या लागत होत्या‌ खेट्या

यापूर्वी पास घेण्यासाठी विद्यार्थ्यांना कायम पैठण आगारात खेट्या माराव्या लागत होत्या. यात विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे अनेकदा समोर आले आहे; परंतु राज्य परिवहन महामंडळाने यंदापासून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शाळेत जाऊन मासिक पास वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT