ST Bus Sakal
महाराष्ट्र बातम्या

एसटी संपाचा दुसरा दिवस; तर महामंडळ हायकोर्टात दाखल करणार याचिका

सकाळ डिजिटल टीम

एसटी कर्मचाऱ्यांचा संप दुसऱ्या दिवशीसुद्धा सुरुच आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात सरकारने समितीचा अध्यादेश काढला असला तरी कर्मचारी संपावर ठाम आहेत. उच्च न्यायालयात आज पुन्हा सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाने गठीत केलेल्या समिती गठीत करण्याच्या निर्णयानंतर संप मागे घेण्याची अपेक्षा महामंडळ प्रशासनाला होती. मात्र, 2017 प्रमाणेच समितीचे गाजर दाखवून संप मोडीत काढण्याचा प्रयत्न आहे. समितीचा निर्णय मान्य नसून संप कायम ठेवण्याची भूमिका कर्मचाऱ्यांनी घेतली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये विलिनीकरण करा अशी प्रमुख मागणी आहे. या मागणीसाठी राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. पुणे, मुंबई, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर यासह राज्यातील सर्वच डेपोमधून एसटी वाहतूक सुरु झालेली नाही.

एसटी कर्मचाऱ्यांच्या विरोधात आता एसटी महामंडळाकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाणार आहे. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपाविरुद्ध अवमान याचिका दाखल केली जाणार आहे. हायकोर्टाने काम बंद आंदोलन करू नये असं सांगितलं होतं. तरीही संप सुरु आहे. त्यामुळे महामंडळाकडून मंगळवारी दुपारी याचिका दाखल करण्यात येणार आहे.

पुण्यामध्ये स्वारगेट एसटी डेपोमध्ये कर्मचारी आंदोलन करत आहेत. सर्व कामगार आंदोलनावर ठाम असून न्यायालयात सुनावणी झाली त्यामध्ये विलिनीकरणाचा मुद्दाच नव्हता असं कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. जर मागणी मान्य झाली नाही तर आम्ही बायका मुलांसह आंदोलन करू असा इशाराही एसटी कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT