ST BUS sakal media
महाराष्ट्र बातम्या

एसटी प्रवाशांचा खिसा होणार खाली, लवकरच होणार दरवाढ

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : आर्थिक संकटात असलेल्या एसटी महामंडळाचे (ST corporation) आर्थिक चाक तोट्याच्या गर्तेत खोल रुतले आहे. त्यात डिझेल, टायर, सुट्या भागांच्या किमती वाढल्याने अडचणींमध्ये भर पडली आहे. परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी महामंडळाने भाडेवाढीचा (ST ticket rate) प्रस्ताव सादर केला आहे. १०० किलोमीटरपर्यंत २५ रुपयांची दरवाढ अपेक्षित असून प्रवाशांचा खिसा खाली होणार आहे.

पहिल्या आणि दुसऱ्या लॉकडाउनमध्ये एसटी सेवेला ब्रेक लागला. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतरही पुरेसे प्रवासी नसल्याने रोज कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागत आहे. अशात एसटीचा संचित तोटा सात हजार कोटीच्याही वर पोहोचला आहे. संकटातून सावरण्यासाठी भाडेवाढीशिवाय दुसरा पर्याय नाही. यामुळे एसटीने १८ टक्के दरवाढीचा प्रस्ताव सादर केला आहे. त्यावर निर्णयासाठी राज्याच्या अप्पर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील परिवहन समितीकडून अभ्यास करण्यात येत आहे. लवकरच समितीचा अहवाल सादर होण्याचे संकेत मिळत आहेत. एसटी महामंडळाने यापूर्वी जून २०१८ मध्ये भाडेवाढ केली होती. त्यानंतर डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. टायरसह वारंवार लागणाऱ्या सुट्या भागांच्या किमतीही चांगल्याच वाढल्या आहेत. यामुळे भाडेवाढ अनिवार्य असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जाते. दरवाढीबाबत प्रवाशांमध्ये संमिश्र भावना आहेत.

डिझेलचे दर मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. महागाई सातत्याने वाढते आहे. राज्याची लोकवाहिनी असलेल्या एसटीला वाचवायचे असेल तर दरवाढ सोसावीच लागणार आहे. थोडा भार प्रवासीही वहन करायला तयार आहेत. पण, सामान्यांच्या परिस्थितीचा विचार करूनच दरवाढ केली जावी.
-दत्तू उमरेडकर, प्रवासी
कोरोनामुळे सर्वसामान्यांची अवस्था दयनीय झाली आहे. अनेकांच्या हातचे काम गेले आहे. गाठीशी असलेली मिळकतही संपली आहे. त्यात एसटीची भाडेवाढ झाल्यास सर्वसामान्यांच्या संकटात भर पडणार आहे. नफ्यातोट्याचा विचार सोडून सध्याच्या स्थितीत दरवाढ लादली जाऊ नये.
-सोपान मरस्कोल्हे, प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लावणीची लय, अभिनयाची जादू अन् अजरामर भूमिका; मधू कांबीकर यांची एक्झिट, मराठी कलाविश्वावर शोककळा

VIRAT KOHLI : विराट कोहलीच्या टेस्ट निवृत्तीला अजित आगरकर जबाबदार? ‘ज्या पद्धतीने त्याच्याशी वागला...’ माजी क्रिकेटपटूचं मोठं वक्तव्य

Kolhapur Ambabai Temple : नवरात्रोत्सवाच्या धामधुमीत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवा वाद; देवस्थान समितीविरोधात पुजारी आक्रमक; नेमका वाद काय?

SA vs AUS 1st Test: व्हॉट अ कॅच...! स्टीव्ह स्मिथची चतुराई अन् आफ्रिकन फलंदाजचा करेक्ट कार्यक्रम; ऑसी खेळाडूचा विश्वविक्रम Video

Latest Marathi News Live Update : ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे १०० नेते दिल्लीत दाखल

SCROLL FOR NEXT