एसटी महामंडळ Sakal
महाराष्ट्र बातम्या

एसटी महामंडळाची मोठी योजना! सामान्य प्रवाशांच्या सहलीसाठी आता खासगी ट्रॅव्हल्सलाही परवानगी; धार्मिक पर्यटनात प्रवाशांसाठी स्वस्तात निवास, भोजनाची असणार व्यवस्था

सर्वसामान्य प्रवाशांना धार्मिक स्थळांना भेटी देता याव्यात, यासाठी आता खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांना एसटीसोबत संयुक्तपणे सहली आयोजित करता येणार आहेत. जेणेकरून सामान्यांना कमी खर्चात निवास आणि भोजन व्यवस्थेसह धार्मिक पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : सर्वसामान्य प्रवाशांना धार्मिक स्थळांना भेटी देता याव्यात, यासाठी आता खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांना एसटीसोबत संयुक्तपणे सहली आयोजित करता येणार आहेत. जेणेकरून सामान्यांना कमी खर्चात निवास आणि भोजन व्यवस्थेसह धार्मिक पर्यटनाचा आनंद लुटता येणार आहे.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या या योजनेत राज्यातील सर्व टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्या सहभागी होतील, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. या अनुषंगाने एसटी महामंडळाच्या मुख्यालयात नुकतीच बैठक पार पडली. महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. राज्यातील गोर-गरीब जनतेला धार्मिक पर्यटनाचा आनंद लुटता यावा, हा या योजनेचा मुख्य हेतू असणार आहे. परिवहन महामंडळाच्या मदतीने खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी कमी गर्दीच्या दिवसात सहलीचे आयोजन करावे. यासाठी पंढरपूरच्या धर्तीवर तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भाविक पर्यटकांना स्वच्छतागृह व निवास व्यवस्था (जिथे उपलब्ध असेल तिथे) निःशुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

श्रावण महिन्यापासून योजनेची सुरवात

कमी गर्दीच्या हंगामामध्ये विशेषतः सुट्ट्यांच्या दिवशी एसटीला प्रवासी भारमान कमी असते. त्यामुळे उत्पन्न कमी मिळते. अशावेळी एसटीने खाजगी टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेसाठी धार्मिक पर्यटनस्थळी सहली आयोजित केल्यास त्यातून एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढेल, तसेच सर्वसामान्य प्रवाशांना किफायतशीर दरात पर्यटनाचा आनंद लुटता येईल, असा या योजनेचा उद्देश आहे. त्या अनुषंगाने खाजगी टूर्स आणि ट्रॅव्हल्स कंपन्यांनी एसटी महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने कमी गर्दीच्या दिवशी पर्यटकांच्या मागणीनुसार अष्टविनायक दर्शन, तुळजापूर- पंढरपूर- अक्कलकोट दर्शन, ज्योतिर्लिंग दर्शन, त्रंबकेश्वर- नाशिक दर्शन अशा धार्मिक सहलींचे आयोजन करण्यात येणार आहे. या उपक्रमाची सुरुवात येत्या श्रावण महिन्यापासून करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : यंदाचा वर्ल्ड कप ब्राझीलचाच! Vinícius Jr. मुळे जुळून आलाय भन्नाट योगायोग; इरतांना धडकी भरवणारी बातमी

Maharashtra Electricity: येत्या दोन वर्षांत गुजरातपेक्षाही स्वस्त वीज: मुख्यमंत्री फडणवीस, २०२९-३० पर्यंत महाराष्ट्र अव्वल ठरणार

Latest Marathi News Live Update : "ग्लोबल साउथ"ला अधिक क्षमता आणि अधिक संधींनी सक्षम केले पाहिजे.

Malshiras Well Accident : हायवे पूर्ण झाल्याचा खोटा दाखला अन् 8 जणांचा विहिरीत बुडून मृत्यू! तांदुळवाडी दुर्घटनेनंतर धक्कादायक माहिती समोर, कंत्राटदार अजूनही मोकाट

FIH Hockey Nations Cup: भारतीय महिला ठरल्या चॅम्पियन! यजमान न्यूझीलंडचा उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT