ST News pandharpur  sakal
महाराष्ट्र बातम्या

Ashadhi Ekadashi: वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळाची विशेष योजना! पंढरीत येणार 15 लाख वारकरी; 1030 बस थेट वारकऱ्यांच्या गावातून

आषाढी वारीसाठी राज्य परिवहन महामंडळाने पाच हजार बसगाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. ४० पेक्षा जास्त प्रवाशांनी बुकिंग केल्यानंतर थेट त्या गावातून बसगाडी देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. त्यानुसार एक हजार ३० गाड्यांचे बुकिंग झाले असून त्या बस आता वारकऱ्यांच्या थेट गावातून पंढरीत येणार आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : आषाढी वारीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एकूण पाच हजार बसगाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. त्यात ४० पेक्षा जास्त प्रवाशांनी बुकिंग केल्यानंतर थेट त्या गावातून बसगाडी देण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. त्यानुसार एक हजार ३० गाड्यांचे बुकिंग झाले असून त्या बस आता वारकऱ्यांच्या थेट गावातून पंढरीत येणार आहेत.

श्री विठ्ठलाच्या आषाढी वारीचा सोहळा १७ जुलैला पंढरीत रंगणार आहे. त्यानिमित्ताने प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मानाच्या पालख्या पंढरीच्या दिशेने निघाल्या आहेत. श्री श्रेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला राज्यभरातून लाखो भाविक-प्रवाशी येतात. अनेक प्रवाशी स्वत:च्या खाजगी वाहनाने, रेल्वेने, एसटीने अथवा विविध पालखीं बरोबर चालत दिंडीने येतात, या प्रवाशांना एसटीने यंदापासून थेट गाव ते पंढरपूर अशी बस सेवा उपलब्ध करून दिली आहे. ४० पेक्षा जास्त भाविक प्रवाशांची संख्या असल्यास त्यांना त्यांच्या गावापासून विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. अर्थात या प्रवासात देखील ७५ वर्षावरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी ५० टक्के तिकीट दरात सुट देणारी महिला सन्मान योजना यासारख्या शासनाने दिलेल्या सर्व सवलती लागू राहणार आहेत. मागील वर्षी एसटीने आषाढी यात्रे निमित्त ४२४५ विशेष बसेस सोडल्या होत्या. यंदा पाच हजार गाड्या सोडण्यात येणार आहेत.

चार तात्पूरर्ती बस स्थानके उभारणार

आषाढी वारीसाठी येणाऱ्या भाविकांसाठी विविध विभागातून बस सोडण्यात येणार आहेत. वारकऱ्यांची गर्दी पाहता एकाच स्थानकावर गर्दी होऊ नये म्हणून यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भिमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना यात्रा स्थानक अशी चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत. तसेच यंदा स्थानिक पोलिस प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून ३६ पेक्षा जास्त वाहतूक नियंत्रक व सुरक्षा रक्षक वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी काम करणार आहेत. गर्दीचा फायदा घेऊन तिकीट न काढणे, वाहकाकडून तिकीट मागून न घेणे अशाप्रकारे फुकट प्रवास करू इच्छिणाऱ्या प्रवाशांना लगाम घालण्यासाठी एसटीने पंढरपूरला जाणाऱ्या विविध मार्गावर १२ ठिकाणी तपासणी नाके उभारण्याचे नियोजन केले आहे. त्यासाठी एसटीचे २०० सुरक्षा कर्मचारी व अधिकारी यात्रा काळात २४ तास नजर ठेवून असणार आहेत.

  • बस स्थानकाचे नाव जिल्हानिहाय सोडण्यात येणाऱ्या बस

  • चंद्रभागा बसस्थानक मुंबई, ठाणे, रायगड, सातारा, पुणे विभाग व पंढरपूर आगार

  • भिमा यात्रा देगाव छत्रपती संभाजी नगर , नागपूर व अमरावती प्रदेश

  • विठ्ठल कारखाना नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर

  • पांडुरंग बसस्थानक सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग

आषाढीसाठी एसटीगाड्यांचे नियोजन

  • एकूण बस

  • ५०००

  • गावातून बुकिंग

  • १०३०

  • आगारातून धावणाऱ्या गाड्या

  • ३९७०

  • एसटी गाड्या सुटणार

  • १३ जुलैपासून

१२ ते १५ लाख वारकरी येण्याचा अंदाज

आषाढी वारीसाठी यंदा महाराष्ट्रासह परराज्यातून देखील मोठ्या प्रमाणावर भाविक पंढरपुरात श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येणार आहेत. पोलिसांच्या अंदाजानुसार यंदाच्या आषाढी सोहळ्यासाठी तब्बल १२ ते १५ लाख भाविक येतील. त्यानुसार पंढरीत १२ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shilpa Shetty Ganeshotsav: शिल्पा शेट्टीच्या घरी यंदा गणेशोत्सव नाही; 22 वर्षांची परंपरा खंडीत होणार!

MLA Rohit Pawar : शिरसाटांचा तत्काळ राजीनामा घ्या; बेकायदा जमीन वितरणप्रकरणी रोहित पवार यांची मागणी

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून रात्री दहा वाजता ८५१७ क्युसेकचा विसर्ग सुरु

Mumbai News : राज्यातील महामंडळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; आठशे कोटींची कर्जे थकीत, गैरव्यवहाराचा संशय

MP Supriya Sule : सत्ताधाऱ्यांकडून पक्ष, घर फोडल्यानंतर आता प्रभाग फोडण्याचे राजकारण सुरू

SCROLL FOR NEXT