St Mahamandal Bus Sakal
महाराष्ट्र बातम्या

CM Eknath Shinde : लालपरीचे गावकऱ्यांसोबत एक ऋणाबंधाचे नाते, ते पुढेही जपले गेले पाहिजे

ग्रामीण भागातील नागरीकासाठी एसटी ही लालपरी आहे. गावकरी आणि एसटी यांच्यात एक ऋणाबंधाचे नाते आहे, ते पुढेही जपले गेले पाहिजे असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

सकाळ वृत्तसेवा

ठाणे - ग्रामीण भागातील नागरीकासाठी एसटी ही लालपरी आहे. गावकरी आणि एसटी यांच्यात एक ऋणाबंधाचे नाते आहे, ते पुढेही जपले गेले पाहिजे असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. प्रदुषणमुक्त, पर्यावरणपुरक, वातानुकुलित ई बसचे लोकापर्ण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील एसटीच्या खोपट डेपो येथे मंगळवारी करण्यात आले.

एसटीच्या ताफ्यात ५१५० इ बसचे लोकापर्ण यावेळी करण्यात आले. यावेळी त्यांनी हे मत व्यक्त केले. तसेच जिथे कोणतेही वाहन पोहचत नाही, तिथे एसटी पोहचत असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

काळ बदलत आहे, स्पर्धात्मक युग येत आहे. तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. त्यात आता एसटीने देखील कात टाकली आहे. इलेक्ट्रीक एसी बस या प्रवाशांच्या सोईसाठी उपलब्ध झाल्या आहेत. या इ बस बोरीवली - ठाणे - नाशिक या मार्गावर चालविल्या जाणार असून टप्यटप्याने राज्याच्या प्रत्येक भागात ही बससेवा सुरु होणार असल्याचा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

राज्यभरात १७३ पेक्षा जास्त बसस्थानकांवर ई बस चार्गींग स्टेशनचे कामही सुरु झाले आहे. ५ हजाराहून अधिक डिझेल बसचे देखील एल.एन.जी. मध्ये प्रवार्तीत करण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. अशा प्रकारच्या बस सेवेत आल्यानंतर, निश्चितच प्रदुषणात घट होणार असल्याचा विश्वासही शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

मागील काही वर्षात एसटी देखील जोमाने काम करीत आहे, पर्यावरण समतोल राखण्याचे कामही आता एसटीच्या माध्यमातून सुरु झाले आहे. त्यामुळेच मागील काही वर्षात तोट्यात सुरु असलेली एसटीची सेवा आता पुन्हा चांगल्या पध्दतीने सुधारतांना दिसत आहे. एसटीचे डेपो स्वच्छतेसाठी बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बसस्थानका अतंर्गत स्वच्छता मोहीमेसाठी एमआयडीसीकडून एसटी डेपोमधील खड्डे मुक्त करण्यासाठी ६०० कोटींचा निधी दिला आहे.

मागील आठ महिन्यांपासून त्यानुसार काम सुरु आहे. परंतु खोपट एसटी डेपोबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. येथे रंगरंगोटी का झाली नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. चांगले काम करणाºयांना मी शाबासकी देतो, मात्र चांगले काम करायचे नसले तर त्यांच्या बाबतीत काय करायचे हे सुध्दा मला ठाऊक आहे, अशी तंबी देखील त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, प्रत्येक एसटी डेपो, बस स्थानक हे स्वच्छ असलेच पाहिजे, तेथे येणाºया प्रवाशांना चांगल्या सोई सुविधा पुरविल्या पाहिजे, स्वच्छ शौचालय देखील दिलेच पाहिजे. बसची स्वच्छता, साफसफाई झालीच पाहिजे, याशिवाय वाहक, चालक आदींसह इतर कर्मचाºयांसाठी असलेले विश्रांती कक्ष देखील चांगले असेल पाहिजे अशी सुचनाही त्यांनी केली. अधिकाºयांनी देखील चांगल्या पध्दतीने काम करायला हवे, मला धावणारा माणूस पाहिजे, थांबणारा माणूस नका असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

खोपट डेपोची पाहणी

एसटी डेपोच्या दुरावस्थेबाबत आणि अस्वस्छतेबाबत एकनाथ शिंदे यांनी अधिकाºयांचे कान टोचल्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष खोपट डेपोमधील स्वच्छतागृहासह, चालक वाहकांच्या विश्रांतीगृहाची पाहणी देखील केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सुर्यकुमार यादवचे कर्णधारपद जाणार? IPL 2026 गाजवणारा भारतीय कॅप्टन होणार,Bcci चा मास्टरप्लान

Bluetooth Risk : मोबाईलचं ब्लूटूथ सतत ठेऊ नका सुरू; नाहीतर होईल मोठं नुकसान, 'हे' 4 धोके समजून घ्या

Latest Marathi News Live Update : पुण्यात आईला शिवी दिल्याच्या रागातून मित्राचा दगडाने ठेचून खून

काव्याला मिळाला रिअरलाईफ पार्थ, थाटात पार पडला विवाहसोहळा, लग्नातील फोटो Viral

Weather Forecast IMD Monsoon Pre Rain : पुढच्या तीन दिवसांचा हवामान अंदाज आला, ६ जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट; तापमान वाढणार

SCROLL FOR NEXT