ST Smart Card esakal
महाराष्ट्र बातम्या

एसटीचे स्मार्ट कार्ड नोंदणीसाठी तब्बल सहा महिन्याची मुदतवाढ

ज्येष्ठ नागरिकांसह सुमारे विविध २९ सवलतीच्या योजनांसाठी एसटी महामंडळाने स्मार्ट कार्ड अनिवार्य केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

ज्येष्ठ नागरिकांसह सुमारे विविध २९ सवलतीच्या योजनांसाठी एसटी महामंडळाने स्मार्ट कार्ड अनिवार्य केले आहे.

मुंबई - ज्येष्ठ नागरिकांसह सुमारे विविध २९ सवलतीच्या योजनांसाठी एसटी महामंडळाने स्मार्ट कार्ड अनिवार्य केले आहे. त्यांच्या नोंदणीसाठी एका कंपनीला कंत्राट दिले आहे. ज्यामध्ये परस्पर तीन कंपन्या पार्टनर आहे. त्यांच्या अंतर्गत वादामुळे स्मार्ट कार्ड नोंदणी गेल्या तीन वर्षांपासून रडतखडत सुरू आहे. सद्या गेल्या आठ महिन्यांपासून नोंदणी ठप्प झाली असून, वेळोवेळी सरासरी दोन महिन्याची मुदतवाढ देण्यात आली मात्र, यावेळी आता तब्बल सहा महिन्याची मुदत देण्यात आली आहे.

एसटी महामंडळाव्दारे विविध सामाजिक घटकांना विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, विविध पुरस्कारार्थी यांना स्मार्टकार्ड देण्यात येत आहे. ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये व ज्येष्ठ नागरिकांच्या येत असलेल्या मुदतवाढीच्या मागणीच्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांचे स्मार्टकार्ड नोंदणीकरण व वितरण ३१ ऑक्टोंबर पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.

त्यानंतर आता स्मार्टकार्ड कार्यप्रणालीच्या काही तांत्रिक अडचणीमुळे स्मार्टकार्ड नोंदणीकरण प्रक्रिया बंद असून केवळ स्मार्टकार्ड नुतनीकरण व स्मार्टकार्ड टॉपअप प्रक्रिया सुरु असल्याचे स्पष्टीकरण देत ३१ मार्च २०२३ पर्यंत मुदत वाढ दिली आहे.

त्यामुळे आता आगारातील ज्येष्ठ नागरिकांची स्मार्टकार्ड तातडीने संबंधितांस वितरीत करण्याबाबत व आगारात कोणत्याही लाभार्थ्याचे स्मार्टकार्ड शिल्लक राहणार नाही अशा सुचना आगार व्यवस्थापक यांना देण्यात येणार आहे. या सहा महिन्याच्या मुदतवाढीत ज्येष्ठ नागरिक स्मार्टकार्ड नोंदणीकरण आगारात प्राप्त झालेली स्मार्टकार्ड ज्येष्ठ नागरिकांनी घेऊन जाणेबाबत जनजागृती करण्याच्या सूचना एसटी प्रशासनाने दिल्या आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

SCROLL FOR NEXT