ST Bus sakal
महाराष्ट्र बातम्या

ST कर्मचाऱ्यांविरोधात महामंडळ दाखल करणार अवमान याचिका

राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सूरू आहे.

सुधीर काकडे

राज्यभरात आज एसटी कर्मचारी (ST Employees) आपल्या मागण्या घेऊन आंदोलन करत आहेत. न्यायालयाने कामावर हजर होण्याचे निर्देश दिल्यानंतर देखील एसटी कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन मागे न घेण्याची भूमिका घेतली आहे. जो पर्यंत एसटी महामंडळाचा (MSRTC) राज्य शासनात समावेश होत नाही, तो पर्यंत हे आंदोलन मागे घेणार नाही या मागणीवर ते ठाम आहेत. एसटी महामंडळ देखील आता कामगारांविरोधात न्यायालयात जाणार आहेत. इंडस्ट्रीयल कोर्ट आणि हायकोर्टाने कोर्टाच्या हे आंदोलन चुकीचं असल्याचं म्हणत आदेशाचा अवमान केल्या प्रकरणी आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल करण्यास सांगितले होते.

एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आज राज्य भरातील सर्व डेपोमधील गाड्या थांबवल्या असून, आपल्या मागण्या मान्य होई पर्यंत कोणतीच बस हालणार नाही, अशी ठाम भूमिका घेतली आहे. त्यानंतर आता एसटी महामंडळ उद्या सकाळी 10 वाजता अवमान याचिका दाखल करणार आहे. महामंडळाने देखील आता कर्मचाऱ्यांविरोधात कठोर भूमीका घेतली असून एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात अवमान याचिका दाखल करणार आहे. तांत्रिक कारणांमुळे आज कागदोपत्री प्रक्रीया पूर्ण होऊ न शकल्यानं उद्या ही याचिका दाखल करण्यात येणार आहे.

दरम्यान, उद्या हायकोर्टात होणार पुन्हा सुनावणी होणार आहे. त्यापूर्वी काल सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी खासगी वाहनांना प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी देण्याचा दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT