ST-Bus Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

ST महामंडळाकडून कारवाईला सुरूवात; 376 कर्मचाऱ्यांचं निलंबन!

राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे.

सुधीर काकडे

महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचं (MSRTC) राज्यशासनात विलीनीकरण करा ही मागणी घेऊन राज्यभरातील ST कर्मचाऱ्यांनी सध्या आंदोलन करत आहेत. यासाठी समिती स्थापन करून त्यावर तोडगा काढण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. मात्र तरीही कर्मचारी आपल्या मागण्या घेऊन आंदोलन (ST Workers Strike) करत आहेत. त्यानंतर आता एसटी महामंडळाकडून कठोर कारवाईची भूमीका घेण्यात आली आहे. महामंडळाने संपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात निलंबनाच्या कारवाईला सुरूवात केली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यभरात संप सुरू आहे. याविरोधात आता एसटी महामंडळाने मोठी कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार महामंडळाने संपावर गेलेल्या ३७६ कर्मचाऱ्यांना निलंबित केलं आहे. यामध्ये राज्यातील ४५ आगारातील कर्मचाऱ्यांचा समावेळ आहे. राज्य सरकारने जीआर काढूनही एसटी संघटनांनी संप मागे घेतला नाही, त्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचं समजतं आहे.

दरम्यान, एसटी महामंडळ उद्या सकाळी 10 वाजता संप करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरोधात अवमान याचिका दाखल करणार आहे. महामंडळाने देखील आता कर्मचाऱ्यांविरोधात कठोर भूमीका घेतली असून एस.टी. कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात अवमान याचिका दाखल करणार आहे. तांत्रिक कारणांमुळे आज कागदोपत्री प्रक्रीया पूर्ण होऊ न शकल्यानं उद्या ही याचिका दाखल करण्यात येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana Installment : लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट; जुलै महिन्याचा निधी जमा, असा चेक करा पेमेंट स्टेटस

MPSC Recruitment 2026 : MPSC चा मोठा निर्णय! औषध निरीक्षक भरती प्रक्रिया रद्द; पोलिसांच्या चौकशीनंतर फेरपरीक्षेची घोषणा, उमेदवारांना पुन्हा द्यावी लागणार परीक्षा!

Gajanan Devkate: सरकारच्या थकीत बिलांचा बळी, कार्यालयांचे उंबरठे झिजवले पण...; देवकातेंचा हृदयद्रावक अंत, सरकारविरोधात कंत्राटदारांचा संताप

Latest Marathi News Live Update : नाना पटोलेंचा सवाल; RSSवर गंभीर आरोप

Asaduddin Owaisi: आमचा धर्म ठरवणारे न्यायाधीश कोण?; हिजाबच्या निर्णयावर ओवैसी आक्रमक , उच्च न्यायालयाच्या निर्णयावर टीका

SCROLL FOR NEXT