Gopichand Padalkar
Gopichand Padalkar Sakal media
महाराष्ट्र

एसटीचा संप तीव्र करणार - गोपीचंद पडळकर

सकाळ वृत्तसेवा

पुणे - ‘महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) राज्य शासनात विलीनीकरण करणे हाच अंतिम पर्याय सरकारपुढे आहे. सरकार संपात फूट पाडण्याचा प्रयत्न करत असून रोज नव्या पुड्या सोडत आहे. संप हाटत नाहीत म्हणून खासगीकरणाची चर्चा सुरू आहे. काही झाले, तरी या संपाचा गिरणी संप होऊ देणार नाही. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल,’’ असा इशारा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिला.

भाजपतर्फे ‘एक सढळ मदतीचा अढळ हात’ या उपक्रमांतर्गत स्वारगेट परिसरातील सातारा रस्त्यावरील एसटी कॉलनीतील कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला एक महिन्याच्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. शहराध्यक्ष जगदीश मुळीक, नगरसेवक धीरज घाटे, स्मिता वस्ते, सरस्वती शेंडगे, रघुनाथ गौडा आदी या वेळी उपस्थित होते.

पडळकर म्हणाले, ‘‘एसटीतला भ्रष्टाचार थांबवला, तरी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यां इतका पगार एसटी कर्मचाऱ्यांना मिळू शकेल. महामंडळ कुणाच्या बापाजाद्याची जहागिरी नाही. एसटी कर्मचाऱ्यांच्या ३८ आत्महत्या झाल्या, तरी दुःख संपत नाही, हे दुर्दैव आहे. संपकऱ्यांची सरकारशी चर्चेशी तयारी; पण सरकारला मार्ग काढायचा नाही.’’

एसटी आंदोलनात मानवतेच्या भावनेतून पाहिलं तर सरकार वेडेपिसे झाले आहे. सरकारला सुचायचे बंद झाले आहे. या संपामुळे शरद पवार यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. एसटीची मोठी मान्यताप्राप्त असलेली संघटना पवारांची आहे. आजपर्यंत पवार यांनी मान्यताप्राप्त संघटनेला हाताशी धरून कर्मचाऱ्यांवर अन्याय केला आहे. पण कर्मचाऱ्यांना आता अन्यायाची जाणीव झाली आहे.

कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांनी लगेचच प्रतिक्रिया दिली. मात्र, एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत. त्यावर सांत्वनाचे दोन शब्द बोलायला तयार नाहीत, असे पडळकर म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT