ST E Ticket Refund Esakal
महाराष्ट्र बातम्या

ST E-Ticket Refund: एसटी संपामुळे ई-तिकीट रद्द केल्यास पैसे परत मिळणार का? वाचा काय आहे नियम

ST Samp E-Ticket Refund: ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केल्याने गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी कोंडी झाली आहे.

आशुतोष मसगौंडे

सध्या राज्यात एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. त्यामुळे अनेक आगारातून एसटी वाहतूक विस्कळीत झाली आहे. याचबरोबर ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केल्याने गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी कोंडी झाली आहे.

गणेशोत्सवापूर्वी हजारो चाकरमान्यांनी गावी जाण्यासाठी ई-तिकिटाच्या माध्यमातून सीट आरक्षित केले होते. पण आता संपामुळे प्रवास न करता आल्यास आरक्षित केलेल्या तिकिटाचे पैसे पत मिळणार की नाही असा प्रश्न हजारो प्रवाशांना पडला आहे.

ई-तिकीट रद्द केल्यास पैसे परत मिळतात का?

ई-सकाळने एसटीचे ई-तिकीट रद्द केल्यास पैसे परत मिळतात का याविषयी एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर चौकशी केली. एसटीच्या संकेतस्थळावर सांगण्यात आले की, ई-तिकीट परवानगी असलेल्या कालावधीत रद्द केल्यास, मूळ भाड्याचा 100% परतावा मिळू शकतो. पण सरकारी सेवा कर शुल्कासह आरक्षण शुल्क आणि सुविधा शुल्क मात्र परत मिळू शकत नाही.

पैसे परत मिळवण्याचे नियम

गाडी सुटण्याच्या 24 तास आधी तिकिट रद्द केल्यास 10%, 12 तास आधी रद्द केल्यास 25% आणि नियोजित प्रस्थान वेळेच्या 4 तासांच्या आत रद्द केल्यास 50% शुल्कच परत मिळू शकते.

बँक खात्यातच येणार पैसे

तिकीट रद्द केल्यास भाड्याचा परतावा संबंधित बँक खात्यातूनच केला जाईल. प्रवाशांना कोणताही रोख परतावा मिळणार नाही.

कसे रद्द करायचे ई तिकीट?

ई-तिकीट रद्द करण्यासाठी महाराष्ट्र राज्य एसटी महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ई-तिकीट सेक्शनमध्ये संबंधि माहिती भरल्यानंतर तुम्हाला ई-तिकीट रद्द करता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT