Sharad Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

'..तर 200 कर्मचाऱ्यांनी जग सोडलं नसतं, याला फक्त शरद पवारचं जबाबदार'

सकाळ डिजिटल टीम

एसटी आंदोलनाला फक्त शरद पवारचं जबाबदार आहेत.

मुंबई : न्यायालयाच्या निर्णयानंतर काल सायंकाळी आझाद मैदानात जल्लोष करणारे एसटी कर्मचारी (ST Workers) अचानक आक्रमक झाले आहेत. या आक्रमक कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या 'सिल्वर ओक' (Silver Oak) या निवासस्थानी गराडा घातलाय.

या आंदोलनाला फक्त शरद पवारचं जबाबदार आहेत. कारण, या एसटी आंदोलनात आमच्या 200 कर्मचाऱ्यांनी जगाचा निरोप घेतलाय आणि याला फक्त शरद पवारचं जबाबदार असल्याचं स्पष्ट मत आंदोलक महिलेनं केलंय. आमच्या आंदोलनाची कोणत्याही नेत्यांनी दखल घेतली नाही, त्यामुळं आमचे कर्मचारी यात मारले गेले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

नेमकं काय झालं?

एसटी महामंडळाचे विलीनीकरण पूर्णपणे करावं या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा एक गट आक्रमक झालेला पाहायला मिळाला. या आंदोलकांना आक्रमक पवित्रा घेत थेट शरद पवार यांचं मुंबईतील सिल्वर ओक हे निवासस्थान गाठलंय. या निवासस्थानाच्या आवारात घुसून आंदोलक कर्मचाऱ्यांनी चप्पल फेक तसंच दगडफेक केलीय.

22 एप्रिलपर्यंत हजर होण्याचा कोर्टाचा अल्टिमेटम

मुंबई हायकोर्टानं एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामावर हजर राहण्याचा अल्टिमेटम दिलाय. तसंच कर्मचाऱ्यांच्या वेतनासंबंधीच्या मागण्याबाबत राज्य शासनाला आदेश दिले. या आदेशाचं आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या कर्मचाऱ्यांनी जल्लोष केला. दरम्यान, जोपर्यंत हायकोर्टाच्या निर्णयाची प्रत मिळत नाही, तोपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत कोणत्या तारखेला, किती वाजता एकाच वेळी निर्णय घेऊ, अशी भूमिका या उपोषणकर्त्या कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी माध्यमांशी बोलताना मांडली होती. मात्र, तरीही कामगार मोठ्या प्रमाणात एकत्र जमले असून त्यांनी शरद पवार आणि अजित पवार यांना जबाबदार धरत त्यांच्या विरोधात घोषणाबाजी केलीय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DCM Sunetra Pawar : वारकऱ्यांसाठी सर्वोत्तम सुविधा उपलब्ध करा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे आदेश

Yavatmal News : सहकार क्षेत्रात खळबळ! जिल्हा बँकेतील संशयास्पद व्यवहारांवर चौकशीचे आदेश

Farmer Tragedy: आडगाव खुर्दमध्ये वादळी वाऱ्याने शेडची भिंत कोसळली; शेतकरी बाप-लेकाचा मृत्यू, पुतण्या गंभीर

Elon Musk: इलॉन मस्क बनले जगातले पहिले ट्रिलियनियर! 'स्पेसएक्स'च्या IPO ने केलं मालामाल

Paithan News : गोदावरी नदीच्या पात्रात अंघोळ करताना आई व बहिणीसमोरच पाण्यात बुडून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

SCROLL FOR NEXT