ST Bus strike sakal media
महाराष्ट्र बातम्या

एसटी महामंडळ उचलणार टोकाचं पाऊल; ५५ हजार कर्मचाऱ्यांना नोटीस

सकाळ डिजिटल टीम

एसटी महामंडळाने एका बाजुला सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त झालेल्यांसाठी जाहीरात काढली आहे तर दुसऱ्या बाजुला ५५ हजार कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Strike) अद्यापही सुरु असून विलिनीकरणाच्या मागणीवर संपकरी ठाम आहेत. राज्य सरकारनं (Maharashtra Government) जरी संप मिटल्याची घोषणा केली असली तरी अद्याप काही कर्मचारी कामावर परतलेले नाहीत. त्यामुळे आता एसटी महामंडळ (MSRTC) टोकाचे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. एकीकडे एसटी कर्मचारी आंदोलनावर ठाम असताना आता महामंडळाने सेवानिवृत्त/ स्वेच्छा निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी जाहीरात काढली आहे. तर दुसऱ्या बाजुला कामावर न येणाऱ्या ५५ हजार कर्मचाऱ्यांना नोटीस पाठवली आहे. (MSRTC send notice to 55 thousand employee)

संप पुकारल्यानंतर कामावर न आलेल्या कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाने नोटीस पाठवून कारवाई का करू नये असं विचारलं आहे. यामध्ये सेवा समाप्ती करण्यात आलेले कर्मचारी वगळून जे कर्मचारी कामावर हजर झाले नाहीत त्यांना शिस्त आणि आवेदन कार्यपध्दतीनुसार अपराध कारवाई का करण्यात येऊ नये अशी कारणे दाखवा नोटीस बजवली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी रांगेत थांबलेल्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू; जळगावच्या जयदीप नेमाडे यांचा दुर्दैवी अंत

Iran Execution : इराणने मोसादच्या गुप्तहेराला दिली फाशी, इस्त्रायलला संवेदनशील लष्करी माहिती पुरवल्याचा आरोप

Amit Shah Kolhapur visit cancelled : अमित शहांचा कोल्हापूर दौरा रद्द; प्रकृती अस्वस्थ असल्याने हुबळीतून दिल्लीकडे रवाना

Latest Marathi News Update : सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणूक इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू

Asian Games 2026: श्रेयस अय्यरच्या संघाला जपानला जाण्यापूर्वी धक्का; BCCI, IOA ची पळापळ, नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT