ST Strike
ST Strike google
महाराष्ट्र

राज्यात एसटीला पुन्हा ब्रेक! कर्मचारी मागण्यांवर ठाम, संप सुरुच

सकाळ डिजिटल टीम

एसटी कामगारांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

एसटी कामगारांनी त्यांच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेला संप आणखी चिघळण्याची शक्यता आहे. राज्यातील २२५ पैकी २२० आगारांमधील एसटी वाहतूक ठप्प आहे. या संपाला राज्यातील कामगार संघटनाकडूनही पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. त्यातच संघर्ष कामगार युनियनने संपूर्ण बंदची हाक दिली आहे. त्यामुळे राज्यभरात लालपरीची धाव थांबली आहे.

एसटी कामगारांच्या संपासंदर्भात मुंबईत आज कृती समितीची बैठक होणार आहे. यात संपाला पाठिंबा देण्याबाबत चर्चा होणार आहे. दरम्यान, कृती समितीमध्ये नसलेल्या संघर्ष एसटी कामगार युनियनने कामगारांच्या मागण्यांना पाठिंबा दिला असून सर्वच आगारांमध्ये एसटी बंदची हाक दिली आहे. सोमवारी सकाळपासून राज्यात एसटी वाहतूक जवळपास ठप्पच झाली आहे. यामुळे बस स्थानकात प्रवाशी थांबून राहिले आहेत. प्रवाशाला एक तर प्रवास रद्द करावा लागत आहे किंवा खाजगी वाहनांनी जावे लागत असल्याचं चित्र दिसत आहे.

काय आहेत मागण्या

राज्य शासनाप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांनाही २८ टक्के महागाई भत्ता आणि वाढीव घरभाडे भत्ता अशी मागणी सरकारने मान्य केली आहे. मात्र, एसटी महामंडळाने समितीच्या मागण्या मान्य करण्यासह वार्षिक वेतनवाढ आणि विलीनीकरणाच्या मागणीबाबत चर्चेचे आश्वासन दिले. काही ठिकाणी कामगारांनी विलीनीकरण आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणीच्या मागणीसाठी संप पुकारला. याला आता राज्यभरातील आगारामधून पाठिंबा मिळत आहे.

प्रवाशांना वेठीस धरण्यासाठी नाही तर आपल्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा संप असल्याची प्रतिक्रीया कर्मचा-यांनी व्यक्त केली. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्या पूर्ण व्हाव्यात हीच या मागची भावना आहे, त्या मुळे संपासारखा मार्ग अवलंबला असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रवाशांनीही एसटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांचा विचार करुन सहकार्य करावे असेही आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने हा संप बेकायदेशीर असल्याचं म्हणत ताशेरे ओढले होते. प्रवाशांचे हाल होत असून कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे आदेश दिले. तरीही कर्मचाऱ्यांनी हा संप सुरुच ठेवला आहे. उच्च न्यायालयात यावर सोमवारी सुनावणी होणार आहे. याशिवाय तोडगा काढण्यासाठी एकूण १७ कर्मचारी संघटनांची बैठकही मुंबईत होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: दिल्लीच्या विजयानं राजस्थानला मिळालं प्लेऑफचं तिकीट! आता उरलेल्या 2 जागांसाठी 5 संघात शर्यत, पाहा समीकरण

IPL 2024 DC vs LSG: दिल्लीने लखनौला मात देत राखला घरचा गड अन् स्पर्धेतील आव्हानही कायम; इशांतचा भेदक मारा ठरला निर्णायक

Chhagan Bhujbal: कोसळलेल्या होर्डिंगशी ठाकरेंचा काय संबंध? भुजबळांचा सरकारला घराचा आहेर

Animals computation: यंदा बुद्ध पोर्णिमेला होणार नाही प्राणी गणना! वरिष्ठांकडून कान उघडणी; काय घडलंय नेमकं?

Ghatkopar hoarding : 'जीव वाचला पण रोजी रोटी गेली'; गंभीर जखमी झालेले टॅक्सी चालक सुभेदार मोर्या यांची व्यथा

SCROLL FOR NEXT