Online Form Sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना बुधवारपासून भरता येणार ‘सीईटी’साठी अर्ज

‘सीईटी संदर्भात विद्यार्थी, पालक आणि अन्य संबंधित घटकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी राज्य मंडळामार्फ यापूर्वी हेल्पलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - राज्य मंडळाची २०२१ पूर्वी दहावीची परीक्षा (SSC Exam) उत्तीर्ण झालेले आणि सीबीएसई, आयसीएसई यांसह अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाच्या सामाईक प्रवेश परीक्षेचे (सीईटी) (CET) ऑनलाइन अर्ज (Online Form) भरण्याची सुविधा बुधवारपासून (ता. २८) उपलब्ध होत आहे. या विद्यार्थ्यांकडून (Student) ‘सीईटी’साठी परीक्षा शुल्क (Exam Fee) आकारले जाणार आहे. या विद्यार्थ्यांना २ ऑगस्टपर्यंत ‘https://cet.11thadmission.org.in’ संकेतस्थळावर अर्ज भरता येणार आहे. (State Board Students will be Able to Apply for the CET from Wednesday)

या विद्यार्थ्यांकडून सीईटीसाठी १७८ रुपये शुल्क यांसह बॅकिंग, पेमेंट गेटवे यांचेही शुल्क भरावे लागणार आहे. विद्यार्थ्यांनीही फोटो आयडी, पासपोर्टच्या आकारातील छायाचित्र, नमुना स्वाक्षरी आणि अन्य कागदपत्रे स्कॅन करून संगणक प्रणालीत अपलोड करायची आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्या निवासस्थानाच्या पत्त्यानुसार परीक्ष केंद्र मिळावे, यासाठी जिल्हा, तालका, शहराचा विभाग निश्चित करावा लागणार आहे.

हेल्पलाइन कार्यन्वित

‘सीईटी संदर्भात विद्यार्थी, पालक आणि अन्य संबंधित घटकांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी राज्य मंडळामार्फ यापूर्वी हेल्पलाइन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी प्रक्रियेतील तांत्रिक बाबींसंदर्भात अडचणी असल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी ९८२३००९८४१ या टोल फ्री क्रमांकावर सकाळी दहा ते सायंकाळी सात या वेळेत संपर्क साधावा,’ असे आवाहन राज्य मंडळाने केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

MPSC Transparency issue: एमपीएससीच्या कारभारावर अपारदर्शकतेचे सावट; बैठकींचे इतिवृत्त व वार्षिक अहवाल लपविल्याने विद्यार्थ्यांचा विश्वास डळमळीत

Legislative Estimate Committee: यवतमाळमध्ये अंदाज समितीच्या मागावर ‘खबऱ्यांचे नेटवर्क’? वाहनांचे फोटो व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हायरल

Amravati Food Safety Action: अमरावतीत घाणेरड्या वातावरणात नूडल्स निर्मिती; कुत्रे-मांजरांचा वावर उघड, दोन गृहउद्योगांचे परवाने तातडीने निलंबित

Marathi News Live Updates: पाषाण-बावधन रस्त्यावर भरधाव कारची धडक, सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू

SCROLL FOR NEXT