State budget 2023 update 9 march 2023 eknath shinde devendra fadanvis govt politics Google
महाराष्ट्र बातम्या

Budget 2023 : राज्याचा अर्थसंकल्प ९ मार्चला

अर्थसंकल्पी अधिवेशन २७ फेब्रुवारी ते २४ मार्चपर्यंत

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प नऊ मार्चला विधिमंडळात सादर होणार आहे. विधीमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत यंदाचे अर्थसंकल्पी अधिवेशन २७ फेब्रुवारी ते २४ मार्च दरम्यान घेण्याचा निर्णय झाला. यामधे, मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा ठराव एकत्रितपणे मांडण्याची विरोधी पक्षनेते अजित पवार यांची सूचनाही मान्य करण्यात आली.

राज्यसरकारने नुकतेच राज्यगीत म्हणून स्वीकारलेले ‘जय जय महाराष्ट्र माझा’ हे गीत अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहांत पूर्ण सन्मानाने आणि शिष्टाचारात वाजविले जाणार आहे. आजच्या बैठकीत विधानपरिषद व विधानसभा बैठकांच्या तात्पुरत्या दिनदर्शिकेवर चर्चा करण्यात आली.

अधिवेशनाची सुरुवात २७ फेब्रुवारी रोजी राज्यपालांच्या अभिभाषणाने होणार आहे. आजच्या बैठकीला विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यासह समितीचे सदस्य मंत्री आणि अधिकारी उपस्थित होते.

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अभिवादनाबाबतचा ठराव दोन्ही सभागृहांत मांडण्यात येणार आहे. तसेच जागतिक महिला दिनानिमित्त ८ मार्च रोजी दोन्ही सभागृहांत याबाबत विशेष चर्चा होईल.

अर्थसंकल्पावर तीन दिवस, तर अर्थसंकल्पी मागण्यांवर सहा दिवस चर्चा करण्यात येणार आहे. विधेयकांपैकी प्रस्तावित विधेयके (मंत्रिमंडळाची मान्यताप्राप्त) पाच आणि प्रस्तावित विधेयके (मंत्रिमंडळाची मान्यता अपेक्षित) आठ अशी अंदाजे १३ विधयके या अधिवेशनात मंजुरीसाठी मांडली जाणार आहेत.

फडणवीस मांडणार पहिलाच अर्थसंकल्प

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थमंत्री म्हणून यंदा पहिलाच अर्थसंकल्प मांडणार आहेत. आजपर्यंतच्या विधिमंडळ कारकिर्दीत फडणवीस यांची अर्थसंकल्पावरील भाषणे गाजली आहे. अर्थसंकल्पाचे अभ्यासक आमदार म्हणून त्यांची ख्याती आहे.

‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ हे पुस्तकही त्यांनी लिहिले आहे. त्यातच यंदाच्या अर्थसंकल्पासाठी जनतेकडून सूचना आणि शिफारशी त्यांनी मागविल्या असून, जनतेच्या मनातील अर्थसंकल्प सादर करण्याचा त्यांचा संकल्प कसा असेल, याची उत्सुकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MHADA: म्हाडाची पुन्हा लाॅटरी निघणार! ‘पीएमजीपी’तून मिळणार ९०० घरे, पन्नास टक्के जागेवर उभारणार सदनिका

आखाती युद्धाचा पर्यटनाला फटका! महिन्याभरापासून विमानसेवा विस्कळीत, ट्रॅव्हल एजन्सीतील प्रवाशांचे बुकिंग रद्द

Solapur Mangalevedha news: ‘बसव ज्योत’ सायकल यात्रेचे मंगळवेढ्यात जल्लोषात स्वागत; महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकासाठी जनजागृतीला वेग

Pune Ambegaon gas crisis: आंबेगावच्या पूर्व भागात गॅस पुरवठा ठप्प; ६० हजारांहून अधिक ग्राहक त्रस्त, उत्तर प्रदेश-बिहारमधील कुटुंबे परतगावी

IPL 2026, SRH vs LSG: रिषभ पंतच्या अर्धशतकाने लखनौने विजयाचं खातं उघडलं; रोमांचक सामन्यात काव्या मारनच्या हैदराबादचा घरात पराभव

SCROLL FOR NEXT