महाराष्ट्र बातम्या

CM Eknath Shinde : राज्यात 'नमो शेतकरी महासन्मान योजना'; मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी 5 मोठे निर्णय

संतोष कानडे

मुंबईः राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज सपंन्न झाली. या बैठकीमध्ये शिंदे-फडणवीस सरकारने नमो शेतकरी महासन्मान योजना जाहीर केली आहे. यासह शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मंत्रिमंडळातील सदस्यांची उपस्थिती होती.

शेतकऱ्यांना आता फक्त एक रुपयामध्ये पीक विमा योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच नमो शेतकरी महासन्मान योजना राज्यात राबविण्यात येणार असल्याचं सरकारच्या वतीने जाहीर करण्यात आलं. विशेष म्हणजे पंतप्रधान किसान योजनेची कार्यपद्धती सुधरवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळ बैठकीतून घेण्याता आला. विशेष म्हणजे सिल्लोडमध्ये मका संशोधन केंद्र स्थापन करण्यासाठी २२.१८ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आलीय.

राज्य सरकारने घेतलेले निर्णय

  1. केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ देणार. लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा

  2. नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राज्यात राबविणार. पीएम किसान योजनेची कार्यपद्धती सुधारणार.

  3. कापूस उत्पादक क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी नव्या वस्त्रोद्योग धोरणास मान्यता. २५ हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करणार

  4. ‘डॉ. पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन’ योजनेस मुदतवाढ. योजना आणखी तीन जिल्ह्यात राबविणार.

  5. सिल्लोड तालुक्यात मका संशोधन केंद्र स्थापन करणार. २२.१८ कोटी खर्चास मान्यता

यासह मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत. राज्याला माहिती तंत्रज्ञानात देशात आघाडीवर नेणाऱ्या नवीन माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणास मान्यता देण्यातआली आहे. ९५ हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करणार कापूस उत्पादक क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी नव्या वस्त्रोद्योग धोरणास मान्यता देण्यात आली. २५ हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करणार सहकारी संस्थांचे कामकाज परिणामकारक व्हावे म्हणून क्रियाशील सदस्यांची व्याख्या स्पष्ट. अधिनियमात सुधारणा करणार बृहन्मुंबईमध्ये समूह पुनर्विकासास मोठे प्रोत्साहन मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Deccan Queen Heritage Coach : मुंबई-पुणे 'डेक्कन क्वीन' नव्या हेरिटेज लूकमध्ये; चहा, नाष्टा, डायनिंग ट्रेनचा अनुभव खतरनाक

Oman Coast Incident : ओमान किनाऱ्याजवळ व्यापारी जहाजावर मोठा हल्ला, १० भारतीयांना वाचवण्यात यश, एक जण बेपत्ता

'तू का आला नाहीस?' असं म्हणत न जन्मलेल्या बाळाला पत्रं लिहायच्या ओम पुरी यांच्या पहिल्या पत्नी, बसलेला मानसिक धक्का

Latest Marathi News Update : सिडकोच्या घराची प्रतीक्षा सोडतीची

Mumbai Pune Journey : कोण कोणाच्या गळाला लागणार? विश्वजित कदमांची भाजपसोबतची जवळीक पुन्हा चर्चेत; मुख्यमंत्र्यांसोबतच्या मुंबई ते पुणे प्रवासाने रंगल्या चर्चा

SCROLL FOR NEXT