election MNC elections 2022 esakal
महाराष्ट्र बातम्या

निवडणूक आयोगाची तयारी सुरू, ओबीसी आरक्षणाशिवाय मनपा निवडणुका?

ओमकार वाबळे

राज्यात येत्या वर्षात मोठ्या महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. सध्या ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. त्यातच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाल्याने चिंता वाढली आहे. मात्र, राज्य निवडणूक आयोग 18 महापालिकांच्या निवडणुका घेण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. यामध्ये नाशिक, सोलापूर, अकोला, अमरावतीसह 18 महापालिकांच्या निवडणुका घेण्याची तयारी सुरू केली आहे. प्रमुख्याने मुंबई, पुणे आणि नाशिक मनपाचाही समावेश आहे. (MNC elections 2022)

राज्य सरकारच्या ओबीसी आक्षणावरील याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलं. (Supreme Court on OBC Reservation) या स्थगितीमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 27 टक्के ओबीसी समाजाचं आरक्षण संपुष्टात आलंय. यानंतर कोर्टाने आरक्षण नसलेल्या ठिकाणी पूर्वनियोजित तारखांप्रमाणेच निवडणूक घेण्यासाठी आदेश दिले. मात्र, ओबीसी आरक्षण लागू होत असलेल्या निवडणुकांबद्दल अद्याप संभ्रम कायम आहे. त्यातच देशात कोरोनाची तिसरी लाट येत असल्याने निवडणुकांवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. (Local Body Elections in Maharashtra)

राज्य निवडणूक आयोगाने ७ जानेवारीपर्यंत सर्वच महापालिकांना सुधारित आराखड्यानुसार आरक्षण निश्चितीसाठी परिपत्रक जारी केलं आहे. सर्वसाधारण प्रवर्ग , अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील लोकसंख्या तसेच अन्य सांख्यिकी माहिती पाठवण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर साधारण पुढील दोन ते चार दिवसांत प्रारूप प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

येत्या वर्षात जानेवारी महिन्याच्या अखेर प्रभाग रचना अंतिम झाल्यानंतर १ फेब्रुवारीला महापालिका निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या अखेरीस राज्यात महापालिका निवडणूक प्रचाराचा धुरळा उडू शकतो.सर्वच राजकीय पक्षांना धक्का दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard In Pune : पुण्यातील औंधमध्ये बिबट्या?, वनविभागाकडून संरक्षणासाठी कोयते घेऊन फिरण्याचे आदेश

Latest Marathi News Live Update : राजगुरुनगर नगरपरिषदेतील कामगारांचं आंदोलन!

दिनेश कार्तिक प्रचंड संतापला, गौतम गंभीरचे काढले वाभाडे; म्हणाला, आपल्याकडे चांगले खेळाडू नाहीत का?

CJI SuryaKant किती कमवतात? सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयातील न्यायाधीशांचे रॉयल पगार अन् भत्ते! एका क्लिकवर...

Pune Kolhapur Sex Case : देवदर्शनावेळी ओळख, थेट शरीरसंबंध ठेवलं अन्; पुण्याच्या महिलेचा कोल्हापुरातील पुरूषासोबत धक्कादायक प्रकार...

SCROLL FOR NEXT