State Election Commission
State Election Commission esakal
महाराष्ट्र

भाजपला दिलासा, काँग्रेसचा आक्षेप राज्य निवडणूक आयोगाने फेटाळला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : भाजपचे आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या मतदानावर कॉंग्रेसने आक्षेप घेतला होता, दरम्यान हा कॉंग्रेसचा आक्षेप राज्य निवडणूक आयोगाने तो फेटाळला आहे. या निर्णयामुळे भाजपला दिलासा मिळाला आहे. दरम्यान आता या प्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोग काय निर्णय घेईल याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

भाजपच्या आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांची मतदान पत्रिका दुसऱ्या कोणीतरी मतपेटीत टाकल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. मतदानावेऴी दोन सहकारी उपस्थित असल्याचाही काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. काँग्रेसकडून निवडणूक आयोगाला ईमेलद्वारे ही तक्रार करण्यात आली होती, दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने हा कॉंग्रेसचा आक्षेप फेटाळून लावला आहे. दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोग या प्रकरणी काय निर्णय घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपने देखील ईमेल करत निवडणूक आयोगाकडे उत्तर पाठवले आहे.

दरम्यान भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्वीट करत कॉंग्रेसच्या आरोपांना उत्तर दिलं आहे. त्यांना म्हटले आहे की, "मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांना कंपॅनियनची गरज लागेल, पाहताक्षणी कुणाच्याही सहज लक्षात येईल. त्यामुळे आम्ही व्हीलचेअर आणि कंपॅनियनसाठी निवडणूक आयोगाकडून रीतसर पूर्व परवानगी घेतली होती. तरीही काँग्रेसनं असा आक्षेप घेणं दुर्दैवी आणि काँग्रेसची पराभूत मानसिकता दाखवणारा आहे, असे चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT