supreme court supreme court
महाराष्ट्र बातम्या

'महापालिकेच्या निवडणूक याचिकेवर सुनावणी घ्या' राज्य निवडणूक आयोगाची विनंती

दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २०२१ ते २२ या वर्षांत मुदत संपणाऱ्या नगर परिषदा, नगर पंचायतींचा प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यासंदर्भात मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून इतर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे

सकाळ वृत्तसेवा

दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २०२१ ते २२ या वर्षांत मुदत संपणाऱ्या नगर परिषदा, नगर पंचायतींचा प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यासंदर्भात मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून इतर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे

औरंगाबाद: महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात तयार करण्यात आलेली वॉर्डरचना व आरक्षण सोडतीवर आक्षेप घेणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. या याचिकेवर लवकर सुनावणी घेण्यात यावी व मतदार यादी अद्ययावत काम करण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाकडे केली आहे. औरंगाबाद महापालिकेचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला होता. त्यानुसार वॉर्डरचना व आरक्षण सोडतीही काढण्यात आल्या. मात्र या प्रक्रियेवर माजी नगरसेवक समीर राजूरकर यांनी आक्षेप घेतला होता. यासंदर्भात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यात न्यायालयाने जैसे थेचे आदेश दिले आहेत.

ही याचिका न्यायप्रविष्ट असतानाच कोरोना संसर्गामुळे राज्यातील सर्वच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडल्या. दरम्यान कोरोना संसर्गाची दुसरी लाट सध्या नियंत्रणात असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगातर्फे निवडणुका घेण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. औरंगाबाद महापालिकेबरोबरच नवी मुंबई, वसई-विरार यासह राज्यातील इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका एकत्रित घेण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने २० ऑगस्ट २०२१ ला सर्वोच्च न्यायालयाला विनंती अर्ज केला आहे.

औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या प्रलंबित असलेल्या याचिकेवर लवकर सुनावणी घेण्यात यावी. तसेच दरम्यानच्या काळात मतदार यादी पूर्ण करण्याचे अर्धवट राहिलेले काम पूर्ण करण्याची परवानगी द्यावी. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच राज्य निवडणूक आयोग निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करेल, असा शब्ददेखील आयोगाने या पत्रात दिला आहे.

कच्चा आराखडा तयार करण्याच्या सूचना-
दरम्यान राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील २०२१ ते २२ या वर्षांत मुदत संपणाऱ्या नगर परिषदा, नगर पंचायतींचा प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यासंदर्भात मुंबई शहर व मुंबई उपनगर वगळून इतर जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT