महाराष्ट्र बातम्या

ST: राज्य सरकारची ST महामंडळाला 300 कोटी रुपयांची तातडीची मदत; कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड?

एसटी महामंडळाकडून 738 कोटी रुपयांची मागणी केली होती

सकाळ डिजिटल टीम

राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला तातडीने मदत जाहीर केली आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारने 300 कोटी रुपयांची मदत एसटी महामंडळाला देण्याचा निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक महिन्याच्या पगारासाठी 360 कोटी रुपयांच्या निधीची गरज भासते. पण राज्य सरकारने 300 कोटी रुपयांचीच मदत जाहीर केली आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीवरुन महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी राज्य सरकारला इशारा दिला आहे.

जेवढी मागणी केली तेवढा निधी सरकारनं द्यावा, अन्यथा सरकारविरोधात पुन्हा संघर्ष उभा करावा लागले असा इशारा बरगे यांनी दिला आहे.कर्मचाऱ्यांचे वेतन थकल्यामुळे एसटी कर्मचारी शिंदे सरकारवर नाराज झाल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या.

दर महिन्याला एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 360 कोटी रुपये लागतात. परंतु तीन महिन्यामध्ये शिंदे सरकारकडून फक्त 600 कोटी रुपयांची रक्कमच राज्य सरकारने एसटी महामंडळाला दिला असल्याची माहिती महाराष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली आहे. एसटी महामंडळाकडून 738 कोटी रुपयांची मागणी केली होती. आता फक्त 300 कोटी रुपयेच देण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly election results 2026 Live Update : १९ व्या फेरीत सुनेत्रा पवारांनी केला पराक्रम, तब्बल १ लाख ६८ हजार मतांची आघाडी

Thalapathy Vijay Victory : 40 वर्षांचा अनुभव अन् अचूक टायमिंग! कोण आहेत ज्योतिषी राधन पंडित? ज्यांनी 'थलपती'च्या विजयाचं केलं होतं भाकीत?

Thermos Linked to Eye Injury Risk: थर्मास ठरतोय डोळ्यांसाठी धोकादायक? नव्या समस्येमुळे जगभरात ८ दशलक्षांहून अधिक प्रोडक्ट्सचा रीकॉल

'तुझा नेता हरतोय...' तरुणाने अफवांवर विश्वास ठेवला; थलपती विजयच्या चाहत्याने निकालाआधीच टोकाचा निर्णय घेतला

West Bengal Election Results : पश्चिम बंगालमध्ये ममतांचा गेम कसा पलटला? भाजपच्या ५ डावांनी बदललं संपूर्ण राजकारण!

SCROLL FOR NEXT