महाराष्ट्र

बाधितांसाठी तीन कोटींची मदत 

सकाळवृत्तसेवा

पुणे  - मुठा उजवा कालवाफुटीमुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या पुनर्वसनासाठी राज्य सरकारकडून विशेष निधी म्हणून ३ कोटी रुपयांचा मदतनिधी मंजूर झाला आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी शुक्रवारी दिली.

दरम्यान, या घटनेत बाधित झालेल्यांना तातडीची मदत म्हणून प्रत्येकी अकरा हजार, तर अंशत- बाधितांना सहा हजार रुपये महापालिकेकडून देण्यात येणार असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले. कालवाफुटीच्या प्रश्नावर पालकमंत्री बापट यांनी महापौर निवासस्थानावर बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बापट आणि टिळक यांनी ही माहिती दिली.

पालकमंत्री बापट म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांसोबत यासंदर्भात बैठक झाली. त्यांनी तातडीने तीन कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. हा निधी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत दिला जाणार आहे. त्यासाठी बाधितांचे तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर ही मदत रोख स्वरूपात द्यायची का वस्तू स्वरूपात द्यायची, याचा निर्णय घेण्यात येईल. तसेच, एक महिन्याचे धान्य टप्प्याटप्प्याने दिले जाईल. सिलिंडर गहाळ झालेल्यांना जुन्या नोंदी पाहून सिलिंडर उपलब्ध करून दिले जातील.’’ महापौर टिळक म्हणाल्या, ‘‘आरोग्याचे प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी डॉक्‍टरांचे पथक नेमण्यात आले आहे.’’  

बापट म्हणाले...
पात्र, अपात्र, ‘गवनि’ पाहून पुनर्वसन
शेतीसाठी आवर्तन पुन्हा सोडणार
उद्यापासून पुणे लष्करमधील पाणीपुरवठा पूर्ववत करणार
बंद जलवाहिनीचे काम नोव्हेंबरअखेर पूर्ण करणार

मदतकार्यात राजकारण नको 
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि खासदार संजय काकडे यांनी बापट यांच्यावर टीका केली. त्यावर बापट म्हणाले, ‘‘राजकारण न करता गांभीर्याने मदतकार्य केले पाहिजे. अजितदादांना राजकारण करायचे ते करू द्या, मी मदत आणण्यासाठी मुंबईत होतो. आम्हाला माणसांची काळजी आहे.’’ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'7 दिवस पत्नी अन् 7 दिवस प्रेयसीसोबत राहतो'; कराराच्या आधारे कोर्टाने केली आरोपीची सुटका

Sanju Samson Fined : अंपायरशी वाद घालणे आले अंगलट... BCCI ची संजू सॅमसनवर मोठी कारवाई; काय आहे संपूर्ण प्रकरण

Kolhapur Lok Sabha : मुश्रीफांच्या सांगण्यावरून कारवाई करत असाल तर मीही छत्रपतीये, याद राखा; संभाजीराजेंचा कोणाला इशारा?

Latest Marathi News Live Update : अमित शहा यांची आज जालन्यात सभा

Share Market Opening: गुंतवणूकदार चिंतेत! शेअर बाजारात पुन्हा घसरण; 'या' शेअर्सचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT