RAJESH TOPE 
महाराष्ट्र बातम्या

मार्च अखेरीस राज्यात कोरोनाच अंत : राजेश टोपे

राज्यात काही प्रमाणात कोव्हॅक्सिनचा तुटवडा असल्याचे टोपे यांनी सांगितले.

सकाळ डिजिटल टीम

जालना : गेल्या काही दिवसांपासून रोज्यातील कोरोना (Corona Cases In Maharashtra) रूग्णांची संख्या सातत्याने कमी होते आहे. त्यापार्श्वभूमीवर राज्यात कोरोना निर्बंध वाढविण्याऐवजी कमी करण्याकडे राज्य शासनाचा विचार आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी दिली आहे. तसेच राज्यात मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत कोरोनाचा अंत होईल, असे महत्त्वाचे विधान टोपे यांनी केले आहे. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

ते जालन्यात बोलत होते. राज्यात पहिल्या डोसचं 92 टक्के लसीकरण झालं असून 55 ते 60 टक्के दुसऱ्या डोसचं लसीकरण झाल्याचे देखील यावेळी सांगितले. (Corona Restriction In Maharashtra)

टोपे म्हणाले की, राजातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी होताना दिसत असून, मुंबई-पुण्यातही रूग्णसंख्या कमी होत आहे. काही जिल्ह्यात रुग्णसंख्या वाढत असली तरी, ती पुन्हा खाली येईल. त्यामुळे आता निर्बंध वाढवण्याऐवजी कमी करण्याकडे राज्य शासनाचा कल आहे. सध्या राज्यात राज्य शासनाकडून लावण्यात आलेले निर्बंध (Corona Restriction In Maharashtra ) टप्प्या-टप्प्याने कमी येईल असंही टोपे म्हणाले. राज्यातील कोरोना बाधितांची संख्या मार्च अखेरीस खूप कमी होईल. कोव्हॅक्सिनचा (Covaxin Dose) राज्यात काही प्रमाणात तुटवडा आहे. तुटवडा पडू नये म्हणून केंद्राने काळजी घेण्याची गरज आहे. राज्यात पहिल्या डोसचं 92 टक्के लसीकरण झालं असून 55 ते 60 टक्के दुसऱ्या डोसचं लसीकरण झालंय अशी माहितीही टोपे यांनी दिली. (Corona Vaccination In Maharashtra)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

Bombay High Court : पोटगीची मागणी म्हणजे खंडणीच, उच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी, नेमकं काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : मुंबईत पावसाची संततधार, समुद्राला मोठी भरती

IND vs ENG 1st T20I पूर्वी अभिषेक शर्माला बसला मोठा धक्का; जसप्रीतबाबतही ICC कडून महत्त्वाचे अपडेट्स, नेमकं काय घडलंय?

SCROLL FOR NEXT