uddhav thackeray sakal
महाराष्ट्र बातम्या

राज्य सरकारचा ‘रिमोट’ माझ्याच हातात : मुख्यमंत्री

रिमोट ही वडिलोपार्जित देणगी असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात महाविकास आघाडीचे अर्थात, शिवसेना (shivsena), राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) आणि काँग्रेसचे (congress) सरकार असले तरी या सरकारचे ‘रिमोट’ आपल्याच हाती असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी सूचित केले. ‘हातातला रिमोट सोडत नाही असे सांगत, रिमोट ही वडिलोपार्जित देणगी असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी रिमोट तिन्ही पक्षांकडे असल्याच्या प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसकडून नोंदविण्यात आल्या.

ठाणे येथील ऑक्सिजन प्रकल्पाचे उद्‌घाटन ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाइन झाले. कार्यक्रमाची सुरवात होताच आमदार प्रताप सरनाईक प्रकल्पाचे उदघाटन करण्याची विनंती करीत ‘साहेब, तिथे रिमोट आहे का, अशी विचारणा केली. त्यावर क्षणाचाही विलंब न करता ठाकरे यांनी मिश्किलपणे उत्तर दिले. ‘‘हातातला रिमोट सोडत नाही. रिमोट ही वडिलोपार्जित देणगी आहे,’’ असे ठाकरे यांनी सरनाईक यांना सांगितले.

विरोधकांसह मित्रपक्षांवरही कुरघोडी मुख्यमंत्री ठाकरे हे आक्रमकपणे विरोधकांना उत्तरे देत आहेत. तेवढेच नाही तर मित्रपक्षांवर कुरघोडी करीत सरकारचे रिमोट आपल्याकडेच असल्याचे ठाकरे यांनी दाखवून दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT