ajit pawar 
महाराष्ट्र बातम्या

मोदींना आठवण करून द्या; अजित पवार यांची आठवलेंना विनंती

सूरज यादव

मुंबई - टर्मिनल 1 आणि 2 वरील प्रवेश मार्ग प्रकल्पाचे उद्घाटन समारंभाचे आयोजन एमएमआरडीएनं केलं होतं. हा प्रकल्प 18 महिन्यात पूर्ण होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या विकासाचा प्रयत्न करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी मोदींनी राज्यासोबत दुजाभाव केल्याची तक्रार केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंकडे केली. तौक्ते वादळानंतर गुरजातला मदतीची घोषणा केली मात्र महाराष्ट्रासाठी अद्याप काहीच दिलेलं नाही. केंद्राची वाट न बघता राज्यातील नागरिकांना मदत केली असंही अजित पवार म्हणाले.

अरबी समुद्रात आलेल्या तौक्ते वादळाने किनारपट्टीवरील भागात प्रचंड हानी झाली. वादळानंतर याचा फटका बसलेल्या गुजरातमधील भागाची पंतप्रधान मोदींनी हवाई पाहणी केली होती. त्यानंतर मोदींनी गुजरातला एक हजार कोटी रुपयांची मदतही जाहीर केली. मात्र महाराष्ट्राला अद्याप मदत देण्यात आलेली नाही. याबद्दल बोलताना अजित पवार म्हणाले की, मोदींनी गुजरातला एक हजार कोटी रुपये दिले पण महाराष्ट्राला अजुनही मदत मिळालेली नाही. महाराष्ट्राला जेवढं वाटतं तेवढं तरी द्या. वादळग्रस्तांना मदतीसाठी मोदींना आठवण करून द्या अशी विनंतीही अजित पवार यांनी रामदास आठवले यांच्याकडे केली.

कोरोनाच्या संकटाने सगळं काही थांबलं आहे. कामं ठप्प झाली आहेत. अशाही परिस्थितीत राज्यातील जनतेला उत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. विकासाला खीळ बसू देणार नाही असंही अजित पवार यांनी म्हटलं.

पेट्रोलच्या किंमती वाढत चालल्या आहेत. त्यात हस्तक्षेप केंद्राने केला पाहिजे. राज्य सरकारही कर लावतं पण केंद्राकडून कर लावतं. केंद्राचा कर जास्त असतो, केंद्राने कर कमी करण्याचा प्रयत्न करावा. अनेक ठिकाणी पेट्रोल 100 रुपये लिटरच्या वर गेलं असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price: सणासुदीत पेट्रोल-डिझेल महागलं! जिओ-बीपीच्या दरवाढीनंतर सरकारी पंपांवर किती भाव? महाराष्ट्रातील नवे दर पाहा

Kochi Mini Cooper Accident : आईने वाढदिवसाला गिफ्ट केली ड्रीम कार, पोराने दारू पिऊन तिघांना चिरडले; म्हणाला- "पप्पा सगळं मॅनेज करतील"

Maharashtra Drought: ग्रामीण भागाला आधाराची गरज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; केंद्रीय पथकाची दुष्काळ पाहणी पूर्ण

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीची आज मतमोजणी; ८३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार

Beed News: जरांगे यांच्या विरोधकाला बीडच्या पालीत मारहाण

SCROLL FOR NEXT