महाराष्ट्र

राज्यात प्लॅस्टिक वापराला शह देण्याच्या योजना

सकाळ वृत्तसेवा

अनेक विकारांची शक्‍यता
प्लॅस्टिकच्या निर्मितीसाठी बिस्फिनोल ए आणि थॅलेट्‌स या दोन रसायनांचा वापर केला जातो. यांना प्लास्टिसायझर्स म्हणतात. जगात कृत्रिम रसायनांच्या निर्मितीमध्ये सर्वांत अधिक निर्मिती या रसायनांची होत आहे. या रसायनांमुळे मेंदूच्या प्राकृत क्रिया बिघडतात, कर्करोग होण्याची शक्‍यता वाढते तसेच अनेक विकार होण्याची शक्‍यता बळावली असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. प्लॅस्टिकचा वारेमाप वापर खाद्यपदार्थांच्या किंवा अन्य वस्तूंच्या पॅकिंगसाठी केला जातो. त्यातील खाद्य, पेय, वस्तू वापरून झाल्यावर त्या आवरणाचा पुढे काहीही उपयोग नसतो म्हणून हे प्लॅस्टिक फेकून दिले जाते. उन्हाने जमीन तापल्यावर यातील विषारी घटक मातीत मिसळले जातात आणि त्याच मातीत आपण अन्नधान्य पिकवतो. त्यामुळे झाडांच्या मुळातून हे रसायन शोषले जाऊन त्याची हानिकारक शृंखला परत मनुष्याच्या आरोग्याला शह देण्यासाठी तयार होते. मातीत फेकलेल्या प्लॅस्टिकमुळे मातीचा कस कमी होतो परिणामी अन्नधान्याचा तुटवडा होण्याची भीती आहे. प्लॅस्टिक पाण्यावर तरंगते. त्यामुळे पृथ्वीवर फेकलेल्या प्लॅस्टिकचा काही भाग मातीतून शेवटी पावसाच्या पाण्याबरोबर वाहून नद्यांच्या प्रवाहातून समुद्रात जातो. जलचर प्राणी आणि माशांची प्रजनन क्षमता याने खालावते आणि त्यांच्या शरीरातही रसायनांचा साठा होऊ लागतो. मासे खाणाऱ्यांनाही त्यातून बिस्फिनॉल ए आणि थॅलेट्‌स मिळू लागते. 

दुधाची पिशवी
५० मायक्रॉनपेक्षा जास्त जाडी असलेल्या दुधाच्या पिशवीसाठी ग्राहकाला ५० पैसे जास्त द्यावे लागणार आहेत. नंतर ही रिकामी पिशवी परत केल्यानंतर त्याला हे ५० पैसे परत मिळतील. ही योजना राज्यात लागू करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे.

पाण्याची बाटली
पिण्याच्या पाण्याच्या १ लिटर आणि अर्धा लिटर बाटलीसाठी ग्राहकांकडून १ व २ रुपये जास्त घेऊन त्या बाटल्या परत केल्यानंतर त्यांना ती रक्कम परत केली जाणार आहे.

विज्ञानसाक्षरता कमी
आपल्याकडे विज्ञानसाक्षरता कमीच आहे. पाण्याची बाटली पुन्हा वापरू नये असे त्यावर लिहिले असते. परंतु आपण त्याकडे लक्ष न देता पुन्हा सर्रास वापर करतो. खाद्यपदार्थांची पाकिटे, कॅरीबॅग, पाण्याच्या बाटल्या यातून शरीरात प्लॅस्टिक जाते. कारण ही उत्पादने आंतरराष्ट्रीय मानकानुसार निर्मित केली जात नाही. प्लॅस्टिक उत्पादनांवर बंदी घातली जाते, परंतु उत्पादन सुरूच आहे. त्यावर बंदी नाही. हा विरोधाभास आहे. आपल्याकडे नियंत्रणाचे कायदे आणि अंमलबजावणी व्यवस्थित होत नाही. प्लॅस्टिकचा दर्जा आणि गुणवत्तेचीही वेळोवेळी तपासणी होणे गरजेचे आहे. जपानमध्ये प्लॅस्टिकचा वापर अतिशय काळजीपूर्वक केला जातो. त्याचाही अभ्यास झाला पाहिजे. प्लॅस्टिक कचरा आयातीबाबतही सजग राहिले पाहिजे. 
- अतुल देऊळगावकर, पर्यावरणतज्ज्ञ


दुधाच्या दर्जावर परिणाम
कृषी क्षेत्रात प्लॅस्टिकचा वापर वाढला आहे. यामुळे जनावरांनाही धोका संभवतो. गायी-म्हशींच्या पोटात प्लॅस्टिक किंवा प्लॅस्टिकचे कण गेले तर त्याचा निश्‍चितच परिणाम दुधाच्या दर्जावर होतो. त्याची प्रत खालावते. परंतु दुधामार्फत प्लॅस्टिकचे कण लहान मुलांच्या शरीरात जात असल्याची सध्यातरी माहिती नाही. याविषयी सखोल संशोधन व्हायचे असून त्यानंतरच यासंदर्भात सविस्तर सांगता येईल.
- डॉ. अविनाश गावंडे, बालरोगतज्ज्ञ

स्लो पॉयझन
प्लॅस्टिकच्या अनिर्बंध वापरामुळे न भूतो न भविष्यति असे संकट मानवासमोर उभे ठाकले आहे. प्लॅस्टिकच्या कचऱ्याने पृथ्वीवरची जागा व्यापायला सुरुवात केली तर मानवाला पृथ्वीवर पाय ठेवायला जागा राहणार नाही. जागा मोकळी करण्यासाठी प्लॅस्टिक ढीग कोठे ठेवावेत, असा प्रश्‍न निर्माण होईल. सारी पृथ्वी प्लॅस्टिकच्या कचऱ्याने व्यापली जाईल. विशेष म्हणजे मानवाच्या शरीरातही प्लॅस्टिकने हातपाय पसरायला सुरुवात केलेली आहे. विविध माध्यमांद्वारे शरीरात जमा होणाऱ्या प्लॅस्टिकमधून कर्करोगासह मेंदूच्या विकारांचाही धोका निर्माण झाला आहे. प्लॅस्टिक ‘स्लो पॉयझन’प्रमाणे काम करत असून वेळीच ठोस उपाययोजना केली नाही तर या संकटातून सुटका होणे शक्‍य नाही.
- डॉ. दिलीप यार्दी, पर्यावरण अभ्यासक

मोठ्या उद्योजकांवर कारवाई हवी
प्लॅस्टिकच्या बाटलीसह साध्या पाण्यातूनही प्लॅस्टिकचे कण शरीरात जात आहेत. याचा अभ्यास झाला पाहिजे. राज्यासह देशात मोठ्या प्रमाणात प्लॅस्टिक कचरा तयार झाला असून त्याची विल्हेवाट कशी लावायची, हा मोठा प्रश्‍न आहे. किरकोळ विक्रेत्यांवर थातूरमातूर कारवाई करून प्लॅस्टिक बंदीचे ईप्सित साध्य होणार नाही. यासाठी जे मोठे उद्योजक प्लॅस्टिक व्यवसायात असून मोठ्या प्रमाणात उत्पादन करीत आहेत, त्यांच्यावर थेट कारवाई होणे अपेक्षित आहे. नाहीतर प्लॅस्टिकच्या संकटापासून वाचणे अशक्‍य होणार आहे.
- सुधीर पालीवाल, पर्यावरण कार्यकर्ते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT