Jayant Patil esakal
महाराष्ट्र बातम्या

Jayant Patil: 'राष्ट्रवादी' सर्वांत मोठा पक्ष होईल प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा विश्वास; तर शिरसाटांची उडवली खिल्ली

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: राज्यात हल्ली विविध पक्षांना जनतेचा कौल असल्याचे सर्व्हे छापून येत आहेत. मात्र, त्यामध्ये काही तथ्य दिसत नाही.

कारण राष्ट्रवादीनेदेखील खासगी स्तरावर काही निवडक मतदारसंघाचा सर्व्हे केला असून, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात मोठा आणि लोकांचा अधिक पाठिंबा असणारा पक्ष म्हणून पुढे येत आहे, हा निष्कर्ष आहे, असा विश्वास पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

यावेळी राष्ट्रवादीने केलेल्या काही मतदारसंघांतील सर्व्हेची माहिती बैठकीत अवगत केल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले. बैठकीत राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी नुकतीच निवड झालेल्या खासदार प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांचा सत्कार करण्यात आला.

शिरसाटांची उडवली खिल्ली

जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याचा दावा शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी केला होता. त्यांच्या या वक्तव्याची पाटील यांनी ‘‘शिरसाटांपेक्षा माझी विश्वासार्हता जास्त आहे. त्यांनी विचारलेल्या प्रश्नावर मला विचारता हे जास्तच झाले,’’ असे म्हणत खिल्ली उडवली.

आम्ही २८८ जागांचा सर्व्हे केला नाही. आम्ही लढवू शकतो त्याच जागांचाच केला आहे. येवला, बारामती किंवा कऱ्हाडचा सर्व्हे करण्याची आम्हाला आवश्यकता नाही. आवश्यकता असणाऱ्या निवडक ठिकाणी सर्व्हे केला असून, त्याठिकाणी फार चांगली परिस्थिती आहे.

- जयंत पाटील, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

No Kings Protest: डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात निषेधाची आग! नो किंग्ज आंदोलन म्हणजे नेमकं काय? लाखो लोक रस्त्यावर का उतरलेत?

'आता वेळ आलीये कार्यसम्राटांना घरी बसवण्याची...'; नाव न घेता शिंदेसेनेला घणाघाती टोला, ठाण्यात भाजपच्या बॅनरची चर्चा

Vande Bharat Express: मुंबई-नांदेड वंदे भारत एक्सप्रेस ६ तास विलंब; प्रवाशांमध्ये संताप

INDW vs ENGW: हिदर नाईटचं शतक अन् इंग्लंडचं भारतासमोर विक्रमी लक्ष्य! गोलंदाजीत दीप्ती शर्मा चमकली

Mhada House Lottery: म्हाडा 'त्या' विजेत्यांची पुन्हा लॉटरी काढणार! कारण आलं समोर

SCROLL FOR NEXT