Maharashtra Weather Chance of heavy rain esakal
महाराष्ट्र बातम्या

Rain Updates: राज्यात पावसाचा जोर वाढला; रेड अलर्टसह अतिवृष्टीचा इशारा

नाशिकमध्ये गोदावरीला पूर आला आहे.

दत्ता लवांडे

मुंबई : राज्यात काही दिवसापासून बंद झालेल्या पावसाने तोंड उघडलं असून राज्यातील अनेक भागांना झोडपून काढलं आहे. त्यामुळे नाशिकमध्ये गोदावरीला पूर आला असून अनेक भागात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर राज्यभर पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.

दरम्यान, नवी मुंबईतील सानपाडा येथे रात्री अतिमुसळधार पाऊस पडला असून मुंबईतील काही ठिकाणी अजूनही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर नाशिकला रात्रभर पावसाने झोडपून काढलं असून गोदावरीला पूर आला आहे. त्यामुळे गोदावरीच्या पात्रातली वाहने वाहून गेल्याची माहिती आहे. पुढील ४ दिवस कोकण आणि मध्य महाराष्ट्राला अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.

हवामान विभागाने दिलेला इशारा

पावसाचा रेड अलर्ट -

रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा

ऑरेंज अलर्ट -

मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर

येलो अलर्ट -

नाशिक, परभणी, भंडारा, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, गडचिरोली, बुलढाणा, चंद्रपूर, वर्धा, वाशिम, गोंदिया, नागपूर, यवतमाळ

त्याचबरोबर मुंबईत ८ ते १० ऑगस्टदरम्यान ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

यासह राज्यातील अनेक भागात पावसामुळे नुकसान झालं आहे. संततधार पावसामुळे कोकणातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक भागातील भातशेती पाण्याखाली गेली असून मध्य महाराष्ट्रातील शेतपिकालाही पावसाचा फटका बसला आहे. त्यानंतर अजूनही पावसाची संततधार सुरू असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs USA T20 World Cup : भारताला मोठा धक्का! जसप्रीत बुमराहची तब्येत बिघडली, स्पर्धेतून बाहेर पडणार?

Malegaon Municipal Corporation : मालेगावचा महापौर कोण? इस्लाम पक्ष आणि शिवसेना आमनेसामने; 'एमआयएम'च्या भूमिकेवर गणिते अवलंबून!

मुख्यमंत्र्यांनी दिली चक्क रामदेव बाबांना टक्कर! 'शीर्षासन' करतानाचा व्हिडिओ व्हायरल; जाणून घ्या शीर्षसनाचे फायदे

Gadchiroli News: सात माओवाद्यांना कंठस्नान, एक जवान हुतात्मा; छत्तीसगड सीमेलगतच्या अबुझमाड जंगलात सुरू होती मोहीम!

New IPO : भारतातील पहिला AI आयपीओ 9 फेब्रुवारीला शेअर बाजारात! GMP मध्ये चांगल्या नफ्याची शक्यता; संपूर्ण माहिती इथे...

SCROLL FOR NEXT