महाराष्ट्र बातम्या

राज्यातील शाळांची घंटा 15 जूननंतरच वाजवा 

संतोष सिरसट

सोलापूर ः राज्यात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. आता ग्रामीण भागतही कोरोना हातपाय पसरु लागला आहे. त्यामुळे शासनाने 15 जूनला शाळा सुरु करु नयेत. शाळांची घंटा 15 जूननंतरच वाजविण्याची मागणी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. 

सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रसार झपाट्याने सुरु आहे. कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगाला वेळीच आवर घालण्यात अपयश येत आहे. त्यामुळे काहीही झाले तरी लहान मुलांचे भवितव्य टांगणीला लावणे योग्य होणार आहे. आमदार सावंत यांनी आपल्या पत्रात विविध मागण्या केल्या आहेत. लहान मुलांना नियम कळत नसतात. शाळा सुरू करण्यापूर्वी एक महिना अगोदर तारीख घोषित करावी. कॉरंटाईनसाठी वापरात असलेल्या शाळा निर्जंतुकीकरण कराव्यात. एका वर्गखोलीत 25 विद्यार्थी बसवावेत. विद्यार्थी संख्येवर शिक्षक नियम बदलावा. ज्या शाळेत 200 पेक्षा जास्त विद्यार्थी आहेत, त्या शाळा दुबार भरवाव्यात. अभ्यासक्रम 50 टक्के करावा. संस्था व शिक्षक यांच्यावर विश्‍वास ठेवून जबाबदारी व अधिकार द्यावेत. विद्यार्थी व शिक्षकांना विमा कवच द्यावे. मास्क, सॅनिटायझर, हॅंडवाश, थर्मल स्कॅनर यासाठी शाळांना आर्थिक तरतूद करुन द्यावी. पोषण आहार शिजवून न देता कोरडा द्यावा. आवश्‍यक शिक्षक भरती तातडीने करावी. प्रत्येक विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी करावी. शैक्षणिक क्षेत्र भेटी रद्द कराव्यात. शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समुपदेशन करावे. विद्यार्थी वाहतूक विषय जबाबदारीने सोडवावा या सूचना पत्राद्वारे मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना आमदार सावंत यांनी केल्या आहेत. पालक व शिक्षकांकडून या सूचना आल्या असल्याचेही त्यांनी त्यामध्ये नमूद केले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT