Teachers award sakal
महाराष्ट्र बातम्या

Teacher Awards : राज्यातील १०८ शिक्षकांना राज्य शिक्षक पुरस्कार जाहीर

निष्ठेने सेवा करणाऱ्या आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या राज्यातील १०८ शिक्षकांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ जाहीर झाले आहेत.

मीनाक्षी गुरव @GMinakshi_Sakal

पुणे - निष्ठेने सेवा करणाऱ्या आणि शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या राज्यातील १०८ शिक्षकांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार’ जाहीर झाले आहेत. शालेय शिक्षण विभागाने २०२२-२३ या वर्षातील राज्य शिक्षक पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. या पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत येत्या मंगळवारी (ता.५) मुंबईत होणार आहे.

या पुरस्कारासाठी शिक्षकांची अंतिम निवड करण्यासाठी २५ ऑगस्ट रोजी राज्य निवड समितीची ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीतील शिफारशीनुसार राज्य सरकारने पुरस्काराची घोषणा केली आहे. या पुरस्कारांचे वितरण शिक्षक दिनाचे औचित्य साधून होणार आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत राहणार आहेत.

प्रवर्गनिहाय पुरस्कारांची संख्या :

प्रवर्ग : पुरस्कारांची संख्या

  • प्राथमिक : ३७

  • माध्यमिक : ३९

  • आदिवासी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणारे शिक्षक (प्राथमिक) : १९

  • थोर समाजसुधारक क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार : ८

  • विशेष शिक्षक कला/क्रीडा : २

  • दिव्यांग शिक्षक/दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेतील शिक्षक : १

  • स्काऊट/गाइड : २

पुरस्कारर्थींच्या यादीत असणाऱ्या पुणे जिल्ह्यातील शिक्षकांची नावे :

- माधुरी शेजवळ, सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तळेगाव ढमढेरे नंबर १

- वैभव पोरे, सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होळकरवाडी

- संपत गर्जे, सहाय्यक शिक्षक, भारतीय जैन संघटनेचे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पिंपरी

- हर्षा पिसाळ, सहाय्यक शिक्षक, लक्ष्मणराव आपटे प्रशाला, पुणे

- संतोष थोरात, सहाय्यक शिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निगडाळे केंद्र राजपूर बीट तळेघर, (ता.आंबेगाव)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : कमी दाबाचा पट्टा सक्रिय पण महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होणार; पुढच्या चार दिवसांचा हवामान अंदाज असा

Ashadhi Ekadashi 2026 Marathi Wishes: "अवघा रंग एक झाला..." आषाढी एकादशीनिमित्त प्रियजनांना पाठवा विठ्ठलभक्तीने ओथंबलेल्या खास मराठी शुभेच्छा

Amruta Fadnavis Fugdi Video : 'पंढरपुरात विठूरायाची भक्ती अन्...'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-अमृता फडणवीसांनी घातली फुगडी, पाहा व्हायरल व्हिडिओ

Vidhansabha: संसदीय परंपरा आणि कायदा कसा बनतो? विद्यार्थ्यांनी समजून घेतली प्रक्रिया! मुख्यमंत्र्यांकडून भरभरून कौतुक!

Pandharpur Ashadhi Ekadashi Live Updates : पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

SCROLL FOR NEXT