pancholi.jpg 
महाराष्ट्र बातम्या

शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी शमविण्यासाठी उचलले 'हे' पाऊल

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : विधानसभा निवडणूक शिवसेना-भाजपने युतीमध्ये लढविली खरी मात्र सत्ता स्थापनेसाठी भाजप-सेनेतील युती तुटण्याची संभवना निर्माण झाली आहे. 

दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून मातोश्री बाहेर युवा पक्ष प्रमुख आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होणार असे बॅनर लावण्यात आले हाेते. आता मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत असे बॅनर लागले आहेत. मातोश्री बाहेर ही बॅनर लावण्याची वेळ सेनेवर का आली, मातोश्रीच्या गोटात अंतर्गत बंडाळी हाेण्चीया भीती सेनेला वाटते का असे सवाल आता उपस्थित हाेत आहेत.  

दरम्यान, गेली पाच वर्षे भाजप-सेना सत्तेत असताना सेेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी मंत्री पदावर कारभार केला त्यांना ही मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली आहेत. यातील एखादा सूर मुख्यमंत्री पदासाठी बाहेर येईल, बंडाळी वाढेल याची भीती बाळगत मातोश्रीने आधीच आदित्य आणि नंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व्हावे असे बॅनरबाजी करून ठेवली आहे का असा राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

आदित्य ठाकरे हे युवा नेतृत्व आहे, त्यात ते नव्याने आमदार झाल्याने, अनुभव नसल्याने त्यांचे नेतृत्व शिवसेनेच्या बड्या नेत्यांना साहजिकच नको आहे. आपले आमदार फुटू नयेत याची काळजी जरी मातोश्रीने घेतली असली तरीही मुख्यमंत्रीपदी आदित्य अथवा उद्धव ठाकरे बसतील असे बॅनर लावत आपल्याच बड्या नेत्यांचे आवाज दाबून ठेवले आहेत.

अश्यातही शिवसेनेत ज्या बड्या नेत्यांना आपण मुख्यमंत्री होऊ अशी स्वप्न पडत आहेत त्यांनी बंडाळीचा सूर काढला तर याचा फायदा भाजप ही घेऊ शकते ही देेखील भीती मातोश्रीला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'माध्यमिक'च्या १४,५०० शिक्षकांचा पगार थांबला! वेतन अधीक्षक लाचेत सापडले, प्रभारी पदभार घ्यायला दुसऱ्या अधिकाऱ्याचा नकार, आता तिसऱ्याकडे पदभार, पण...

Farali Chilla: संकष्टी चतुर्थी स्पेशल! 15 मिनिटांत बनवा कुरकुरीत फराळी चिला; खिचडी आणि वडा खाण्याचा कंटाळा येईल

जुलैचा पाऊस सोलापूरसाठी बेभरोशाचा! १६ जुलै १९०७ रोजी २४ तासांत १६०.३ मिलिमीटर, तर १९८९ सालातील जुलैत पडला होता ३६९.६ मिमी पाऊस, त्यानंतर निराशाच, वाचा...

POR vs CRO: ख्रिस्तियानो रोनाल्डोचे स्वप्न कायम! Goncalo Ramosचा अविश्वसनीय गोल, पोर्तुगालचा नाट्यमयरित्या क्रोएशियावर विजय

POR vs CRO Live: ख्रिस्तियानो रोनाल्डोने इतिहास रचला! चेहऱ्यावरचा आनंद बरंच काही सांगून गेला, Video Viral

SCROLL FOR NEXT