Corona Vaccine sakal
महाराष्ट्र बातम्या

Corona Vaccine : राज्यात कोरोना प्रतिबंधक लशींचा दीड लाखांचा साठा शिल्लक

कोरोना प्रतिबंधक लस घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने कमी झाल्याने दीड लाख लशींचा साठा राज्यात शिल्लक आहे.

योगीराज प्रभुणे yogiraj.prabhune@gmail.com

कोरोना प्रतिबंधक लस घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने कमी झाल्याने दीड लाख लशींचा साठा राज्यात शिल्लक आहे.

पुणे - कोरोना प्रतिबंधक लस घेणाऱ्यांची संख्या झपाट्याने कमी झाल्याने दीड लाख लशींचा साठा राज्यात शिल्लक आहे. मात्र, दिवसाला जेमतेम पाचशे जण सध्या लस घेत असल्याची माहिती पुढे आली.

राज्यात गेल्या चार महिन्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे त्याचा थेट परिणाम कोरोना प्रतिबंधक लसिकरणाचे प्रमाण कमी होण्यावर झाला आहे. राज्यात एकेका दिवसात हजारो जणांनी लस घेतली. मात्र, आता ही संख्या पाचशेपर्यंत कमी झाली. त्यातून राज्यात कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन लशीचा साठा शिल्लक राहिला आहे. मार्चअखेरपर्यंत हा लशीची मुदत आहे. त्यानंतर ही लस वापरता येणार नाही, अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्यातर्फे देण्यात आली.

भविष्यातील कोरोनाच्या संभाव्य उद्रेकाचा विचार करून कोव्हिशिल्ड लशीच्या डोसची मागणी केंद्राकडे नोंदविण्यात आली आहे. लवकरच हे डोस राज्याला मिळतील. त्यामुळे कोरोनाला रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय राज्याने घेतला असल्याचेही खात्यातर्फे सांगण्यात आले.

राज्यात संसर्गाचा दर 9.42 टक्के आहे. राज्यभरात आतापर्यंत आठ कोटी 63 लाख 85 हजार 820 नमुने प्रयोगशाळेत तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 81 लाख 37 हजार 409 रुग्णांना कोरोना झाल्याचे निदान झाले. गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्गाचा दर आणि मृत्यू दर सातत्याने कमी होत असल्याचे माहिती आरोग्य खात्याने दिली. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लस घेण्याला नागरिक आता प्राधान्य देत नाहीत, असेही खात्यातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

'शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्याचा थेट परिणाम लसीकरण केंद्रांवर येणाऱ्या नागरिकांचे प्रमाणही कमी झाल्याचे निरीक्षण महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फेही नोंदविण्यात आले. या बाबत महापालिकेचे सहायक आरोग्य प्रमुख डॉ. सूर्यकांत देवकर म्हणाले, 'कोरोनाचा ओमिक्रॉन हा नवीन व्हेरियंट आल्यानंतर पुणेकरांनी लसीकरण केंद्रांवर गेल्या वर्षी रांगा लावल्या होत्या. त्यानंतर बूस्टर घेण्यासाठी जुलैमध्ये पुणेकरांची मागणी वाढली होती. आता लसीच्या मागणीत वेगाने कमी होत आहे.'

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य खात्याचे सहायक संचालक (लसीकरण) डॉ. सचिन देसाई म्हणाले, 'राज्यात लसीचा मुबलक पुरवठा आहे. लसीकरणाचा वेग मात्र सध्या कमी झाला आहे. त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार अशा सहव्याधी असलेल्या रुग्णांनी कोरोना प्रतिबंधक लस आवर्जून घ्यावी. त्यातून कोरोनाच्या उपचारातील गुंतागुंत निश्चित टाळता येते. लस घेतल्यानंतर कोरोना झाला तरीही रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागत नाही. घरातच त्याच्यावर यशस्वी उपचार करता येतात. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक लशीचा दुसरा डोस किंवा बूस्टर डोस राहिलेल्या नागरिकांना जवळच्या लसीकरण केंद्रात जाऊन तो तातडीने घ्यावा.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Australia relations: ऑस्ट्रेलियाचं भारताला समर्थन; 'टॅरिफ'बद्दल भूमिका काय? चीनची भीती की...

Income Tax: भारताने केला नवा विक्रम! देशातील लोक कॉर्पोरेट कंपन्यांपेक्षा जास्त कर भरतात; अहवालात उघड

‘My Bappa Stories with Sakal’ : तुमच्या गणपती बाप्पाची खास गोष्ट सांगण्याची संधी, सकाळवर झळकणार तुमचे रील्स शिवाय जिंका खास बक्षिसे

Video Viral: एका माशीमुळे खेळाडूने जिंकले तब्बल १७ कोटी रुपये, पाहा नेमकं काय झालं?

Alandi Ganesh Festival : आळंदी नगर परिषदेची पर्यावरण रक्षणासाठी कृत्रिम हौदांची व्यवस्था, गणेश विसर्जनासाठी नवा उपक्रम

SCROLL FOR NEXT