Baramati esakal
महाराष्ट्र बातम्या

Baramati: बारामतीत भटक्या कुत्र्यांचा वावर वाढला! तीन वर्षांच्या बालिकेवर कुत्र्यांचा हल्ला

मिलिंद संगई, बारामती

BARAMATI: शहरातील खत्री इस्टेटमध्ये साडेतीन वर्षांच्या बाळावर आज भटक्या कुत्र्यांनी हल्ला करत त्याला जखमी केले. महिनाभरात त्याच ठिकाणी दुस-यांदा लहान बाळावर कुत्र्यांनी हल्ला करण्याचा प्रकार घडल्याने स्थानिक नागरिकात संतापाचे वातावरण आहे. Latest Marathi News

युवान केदार जाचक (वय साडेतीन वर्षे, रा. खत्री इस्टेट, कॅनॉल रोड, बारामती) हा आज दुपारी आपल्या घराच्या दारात खेळत होता. दारात खेळत असताना चार पाच भटक्या कुत्र्यांनी अचानकच त्याच्यावर हल्ला करुन त्याच्या हातापायांना जोरदार चावा घेतला. काही क्षणातच स्थानिक नागरिक विशाल आगवणे तसेच त्याचे पालक धावून आल्याने कुत्री पळून गेली. मात्र यात युवान कमालीचा घाबरला होता. Marathi Tajya Batmya

त्याला तातडीने डॉ.सौरभ मुथा यांच्याकडे पुढील उपचारासाठी पालकांनी नेले. दरम्यान त्याची प्रकृती स्थिर असून त्याला काही इंजेक्शन्स द्यावी लागतील, अशी माहिती डॉ. सौरभ मुथा यांनी दिली. गेल्याच महिन्यात आश्वी जगदाळे या मुलीला भटक्या कुत्र्यांनी वीस ठिकाणी चावे घेत जखमी केले होते. Latest Marathi News

ते प्रकरण ताजे असतानाच आज पुन्हा त्याच ठिकाणी युवान जाचक याला भटक्या कुत्र्यांनी जखमी केल्यानंतर आता लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बारामती नगरपालिकेने कुत्र्यांचा बंदोबस्त करावा या बाबत ठोस उपाययोजना करावी, अशी बारामतीकरांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News : सुप्रिया सुळेंच्या आरोपांना पोलिस आयुक्तांचे उत्तर! आकडेवारीसह मांडले पुण्याच्या सुरक्षेचे वास्तव

Mumbai T20 League: शाश्वत जगतापचे खणखणीत शतक अन् ईगल ठाणे स्ट्रायकर्सचा बांद्रा ब्लास्टर्सवर दणदणीत विजय

Thane: महावितरणविरोधात आंदोलन अन्‌ राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; प्रशासनावर नेत्याचा गंभीर आरोप

Pune Crime : तळलेल्‍या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर; ‘एफडीए’ ची ५ ठिकाणी धाड, १९ लाखाहून अधिक रकमेचा साठा जप्त

Jalana Viral Video: दागिन्यावर डोळा, गावकऱ्यांनी भोंदूबाबाला दिला चांगलाच चोप, काय घडलं?

SCROLL FOR NEXT