solapur city police sakal
महाराष्ट्र बातम्या

सोलापूर पोलिसांची दमदार कामगिरी! १४ वर्षांच्या मुलीसोबत विवाह करणाऱ्या तरूणासह सोलापुरातील बेपत्ता ५७ पुरूष, ५१ महिलांसह ८ बालकांना १० दिवसांतच शोधले

शहरातील विविध भागातून बेपत्ता झालेल्यांच्या शोधासाठी पोलिस आयुक्तांनी सर्व पोलिस ठाण्यांच्या माध्यमातून आठ पथके तयार केली होती. अवघ्या दहा दिवसांतच पोलिसांनी दमदार कामगिरी करीत हरविलेल्या तब्बल ११६ व्यक्तींना शोधून काढले.

तात्या लांडगे

सोलापूर : शहरातील विविध भागातून बेपत्ता झालेल्यांच्या शोधासाठी पोलिस आयुक्तांनी सर्व पोलिस ठाण्यांच्या माध्यमातून आठ पथके तयार केली होती. अवघ्या दहा दिवसांतच पोलिसांनी दमदार कामगिरी करीत हरविलेल्या तब्बल ११६ व्यक्तींना शोधून काढले.

सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयातर्फे पोलिस आयुक्त एम. राजकुमार, पोलिस उपायुक्त डॉ. दीपाली काळे, सहायक पोलिस आयुक्त प्रांजली सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलिस निरीक्षक महादेव राऊत यांच्या नेतृत्वाखालील सहा पथकांनी शहरातील हरविलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ६ ते १६ मार्च या काळात विशेष मोहीम राबविण्यात आली.

सात पोलिस ठाण्याअंतर्गत ही मोहीम राबविली गेली. त्यात फौजदार चावडी, एमआयडीसी पोलिसांनी प्रत्येकी १९, जेलरोड पोलिसांनी सहा, सदर बझार पोलिसांनी आठ, विजापूर नाका पोलिसांनी ११, सलगर वस्ती पोलिसांनी नऊ, जोडभावी पेठ पोलिसांनी १५, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने सर्वाधिक २९ जणांना शोधून काढले आहे. यापूर्वी ऑपरेशन मुस्कानअंतर्गत १३४ महिला व १३ अल्पवयीन बालकांना शोधण्यात पोलिसांना यश आले होते. जानेवारीत विशेष मोहीम राबविली, त्यावेळी १३८ बेपत्ता व्यक्ती व एका बालिकेस आणि फेब्रुवारी २०२४मधील विशेष मोहिमेअंतर्गत ९२ जणांना (४९ पुरुष, ३७ महिला व सहा बालके) पोलिसांनी शोधले होते. या कामगिरीबद्दल पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी सर्व पथकांचे विशेष अभिनंदन केले आहे.

विवाह केलेल्या १४ वर्षीय मुलीचाही समावेश

फौजदार चावडी पोलिसांनी शोधलेल्या दोन मुलींमध्ये शहरातील १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचाही समावेश आहे. आई-वडिल नसलेल्या अकलूज येथील मुलासोबत तिने तीन महिन्यांपूर्वी विवाह केला होता. पोलिसांनी त्या मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करून अल्पवयीन मुलीला तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले आहे. त्या तरूणाला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. त्याच्याविरूद्ध पोक्सोसह बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, वडिलांसोबत घरगुती कारणातून भांडण झाल्याने ती कर्नाटकात गेली. तिलाही पकडून आणले. दुसरीकडे शिक्षण घेत असतानाही आई-वडिल मनाविरुद्ध विवाह करीत असल्याने शहरातील एक मुलगी पुण्याला पळून गेली होती. त्याठिकाणी ती वसतीगृहात राहत होती. फौजदार चावडी पोलिसांनी तिला या मोहीमेच्या माध्यमातून शोधून काढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठी घसरण! 11 सप्टेंबरला पुन्हा दर कोसळणार? जाणून घ्या ताजी अपडेट

‘त्याला माझी इनसिक्युरिटी वाटायची’; अनेक वर्षांनंतर नीना गुप्तांनी उघड केलं गुपित, म्हणाल्या...'माझ्यापेक्षा जास्त...'

ChatGPT's 80s Photo Trend: Instagram वर व्हायरल होतोय 'ChatGPT ’80s Photo Trend'; 'हा' सोपा प्रॉम्प्ट वापरून तयार करा तुमचा ८० च्या दशकातील रेट्रो लूक!

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Share Market Today: इराणच्या अमेरिकेला धमकीने शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; कोणत्या शेअर्सला मोठा फटका?

SCROLL FOR NEXT