CM Uddhav Thackeray Team eSakal
महाराष्ट्र बातम्या

'उद्धव साहेब...आम्ही ३ हजार खर्च करून आलोय, शेतकऱ्यांच्या मुलांशी खेळू नका'

सकाळ डिजिटल टीम

पुणे : आधीच नोकरी नाही. त्यात मरमर करून परीक्षेचा अभ्यास केलाय. त्यातही परीक्षेच्या केंद्राबाबत प्रवेश पत्रावर माहिती नाही. दोन आणि तीन हजार रुपये खर्च करून बीडवरून पुण्याला आलोय साहेब... तुम्ही अशी वेळेवर परीक्षा रद्द केली. साहेब...आम्ही शेतकऱ्यांचे मुलं आहोत. आमच्यासाठी १०० रुपयेही जास्त आहेत. उद्धव ठाकरे साहेब...शेतकऱ्यांच्या मुलांशी असं खेळू नका हो...या संतप्त भावना आहेत, बीड ते पुणे असा सहा तास प्रवास करून आरोग्य विभागाची परीक्षा द्यायला आलेल्या शेतकऱ्याच्या मुलाच्या.

आरोग्य विभागाची परीक्षा प्रवेश पत्रामुळे आधीपासूनच चर्चेत होती. अनेक विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्रावर केंद्राचे नाव नव्हते, तर कोणाच्या प्रवेश पत्रावर शहराचे नाव नव्हते. तरीही विद्यार्थी परीक्षा देण्यास पोहोचले. मात्र, शुक्रवारी सायंकाळी ७ वाजता न्यासा कम्युनिकेशनने परीक्षा घेण्यास असमर्थता दर्शविली. त्यानंतर उमेदवारांच्या हिताचा विचार करत कोणाचेही नुकसान होऊ नये म्हणून गट क मधील जागांसाठीसाठी २५ सप्टेंबर रोजी होणारी आणि गट ड मधील जागांसाठी २६ सप्टेंबर रोजी होणारी लेखी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय तातडीने घेण्यात आला. पण, यामुळे विद्यार्थ्यांना मनःस्ताप सहन करावा लागलाय.

ब्लॅक लिस्ट कंपनीची निवड कोण करतंय?

'आरोग्य विभागाच्या भरतीसाठी २०२० पासून टेंडर काढलं होतं. त्यामध्ये पाच कंपन्या होत्या. मात्र, पाचवी कंपनी न्यासाची निवड केली होती. पण, ही कंपनी आधापासूनच ब्लॅक लिस्टमध्ये आहे. मग ब्लॅक लिस्ट कंपन्या निवडते कोण? तुम्ही ब्लॅक लिस्ट कंपन्या निवडून भ्रमनिरास करताय. महा-आयटीचे कारभार पाहणारे सतेज बंटी पाटील हा घोळ कोणी घातलाय?' असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी 'साम टीव्ही'सोबत बोलताना उपस्थित केलाय.

परीक्षेचे शुल्क मंत्र्यांच्या घरात जातेय?

२०२० मध्ये जेव्हा परीक्षा घेण्याचे ठरले, त्याचवेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा घेण्यास तयार होता. मात्र, सरकारने आयोगाचे ऐकले नाही. आयोगाने घेतलेल्या परीक्षा वगळता, सर्वच परीक्षांमध्ये घोळ होतोय. परीक्षेसाठी खासगी कंपन्या विद्यार्थ्यांकडून ज्यादा शुल्क आकारतात आणि तेच पैसे मंत्र्यांच्या घरात जातात, असाही गंभीर आरोप एका विद्यार्थ्याने 'साम टीव्ही'सोबत बोलताना केला.

रात्री ७ वाजता परीक्षा देण्यासाठी पोहोचलो, पण...

साहेब...मी चार तास खर्च करून गडचिरोलीवरून नागपूरला आलो. रात्री ७ वाजता नागपूरला पोहोचलो. राहायचं कुठे हा प्रश्न होता. पण, ती सोय केली आणि ऐनवेळी परीक्षा रद्द केल्या. मी गरीबाचा मुलगा आहे. माझे आर्थिक नुकसान झाले, ते आता कोण भरून देणार? असा सवाल आरोग्य विभागाची परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्याने उपस्थित केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT