महाराष्ट्र

मोफत एसटी प्रवासापासून विद्यार्थिनी अजून वंचितच

सकाळवृत्तसेवा

मंचर - अहिल्याबाई होळकर मोफत प्रवास योजनेअंतर्गत इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतच्या मुलींना एसटीतून मोफत प्रवास करण्याबाबत सवलत देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी त्वरित करावी, असे परिपत्रक राज्य परिवहन महामंडळाच्या मुंबई येथील कार्यालयाचे महाव्यवस्थापक (वाहतूक) यांनी राज्यातील सर्व राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभागीय कार्यालयांना शुक्रवारी (ता. १२) रोजी पाठविले आहे. त्यामुळे मुलींना मोफत प्रवासाच्या योजनेचा मार्ग खुला झाला आहे; पण अजून आदेश बसस्थानकापर्यंत न पोचल्याने पैसे देऊनच प्रवास करावा लागत असल्याने विद्यार्थिनींमध्ये नाराजी आहे. 

गेल्या महिन्यात राज्य मंत्रिमंडळातील निर्णयानुसार १५ ऑक्‍टोबरपासून मोफत प्रवास करता येईल, अशी विद्यार्थिनींची अपेक्षा होती. दरम्यान, मंगळवारी (ता. २३) अनेक विद्यार्थिनींनी मंचर बस स्थानकात मोफत प्रवास मागणीबाबत चौकशी केली; 

पण अजून आमच्यापर्यंत आदेश पोचलेले नाहीत. त्यामुळे आमचा नाइलाज आहे, असे वाहतूक नियंत्रक यांनी सांगितले.

वैशाली सुरेश लोखरे या विद्यार्थिनीने २०० रुपये, कोल्हारवाडीच्या वैष्णवी शिवाजी गावडे या विद्यार्थिनीने ५०० रुपये देऊन एसटीचा पास घेतला आहे. राज्य परिवहन महामंडळाने याबाबतच्या निर्णयाची ताबडतोब अंमलबजावणी करावी, अशी मागणी शीतल संदीप हिंगे, मयूरी संतोष एरंडे व मोनिका रंगनाथ चासकर या विद्यार्थिनींनी केली आहे. 

मंचर येथे अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात शिक्षणासाठी दररोज थुगाव येथून ये-जा करते. मंगळवारी (ता. २३) ४०० रुपये देऊन मंचर बस स्थानकातून एसटीचा पास घेतला आहे.
- काजल अशोक थोरात, विद्यार्थिनी, थुगाव (ता. आंबेगाव)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT