खासगी, स्कूल बसना सरकारकडून परवानगी  सकाळ
महाराष्ट्र बातम्या

‘अनफिट’ स्कूल बसमधून विद्यार्थी वाहतूक! RTO, वाहतूक पोलिसांचे नाही लक्ष

शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस ‘फिट’ असणे बंधनकारक आहे. पण, सोलापूर शहरातील ५२५ बसपैकी जवळपास १४० स्कूल बसकडे फिटनेस प्रमाणपत्रच नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. अनफिट स्कूल बसमधून विद्यार्थ्यांची वाहतूक बिनधास्तपणे सुरू असल्याची स्थिती आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस ‘फिट’ असणे बंधनकारक आहे. पण, सोलापूर शहरातील ५२५ बसपैकी जवळपास १४० स्कूल बसकडे फिटनेस प्रमाणपत्रच नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. अनफिट स्कूल बसमधून विद्यार्थ्यांची वाहतूक बिनधास्तपणे सुरू असल्याची स्थिती आहे. तरीदेखील त्याकडे ना आरटीओ अधिकारी ना शहर वाहतूक पोलिसांचे लक्ष आहे.

जिल्ह्यातील शाळा १५ जूनपासून सुरू झाल्या आहेत. शाळा सुरू होऊन महिना उलटला, पण फिटनेस प्रमाणपत्र किंवा बसची पासिंग न करताच सुमारे २०० बस बिनधास्तपणे शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करीत आहेत. गुरुवारी (ता. २१) आसरा चौकात एका स्कूल बसच्या बॅटरीत बिघाड झाल्याने चिमुकल्यांना दुसऱ्या बसमधून प्रवास करावा लागला होता. अनेक राज्यांत, जिल्ह्यांत स्कूल बसमधून प्रवास करणाऱ्या चिमुकल्यांना चालकांच्या चुकीमुळे व बसच्या तांत्रिक बिघाडामुळे जीव गमवावा लागला आहे. या पार्श्वभूमीवर आठ वर्षांखालील स्कूल बससाठी दोन वर्षांतून एकदा तर त्याहून जुन्या बससाठी दरवर्षी फिटनेस प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. मात्र, अनेकजण त्या नियमाला बगल देऊन बिनधास्तपणे अनफिट किंवा विनापासिंग स्कूल बसमधून विद्यार्थ्यांची वाहतूक करीत आहेत. अनेक शाळांच्या स्वत:च्या स्कूल बस आहेत. तसेच बऱ्याच स्कूल बस खासगी मालकीच्या आहेत. फिटनेस प्रमाणपत्र नसतानाही आणि पासिंग नसतानाही स्कूल बस रस्त्यावर कशा, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.

१०० स्कूल बसचालकांना नोटीस


शाळा सुरू झाल्यानंतर ज्या स्कूल बसचे पासिंग झालेले नाही किंवा फिटनेस प्रमाणपत्र नाही, त्यांनी आरटीओ कार्यालयाकडून ते प्रमाणपत्र घ्यावे, असे आदेश आरटीओ कार्यालयाने बैठक घेऊन दिले होते. पण, सध्या शहरातील ५२५ पैकी १०० हून अधिक स्कूल बसचालकांकडे त्यांच्या बसचे फिटनेस प्रमाणपत्रच नाही. तर दुसरीकडे, अनेकांनी पासिंगच करून घेतलेले नाही, असे आरटीओ कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

शहरातील सद्य:स्थिती


एकूण स्कूल बस
५२५
‘फिटनेस’ नसलेल्या बस
१४०
विनापासिंग अंदाजित बस
१५०
आरटीओची नोटीस
१००

स्कूल बससाठी नियम, पण पालन नाहीच


● स्कूल बसमध्ये प्रथमोपचार संचामध्ये आवश्यक सर्व प्रथमोपचार साहित्य व औषधे उपलब्ध असणे गरजेचे
● बसमध्ये ५ किलोग्रॅम वजनाची दोन अग्निशमन यंत्रे असावीत; एक चालक कक्षात तर दुसरे संकटसमयी बाहेर पडावयाच्या मार्गाजवळ
● बसच्या खिडक्यांमध्ये तीन आडव्या दांड्या असाव्यात. दोन दांड्यांमधील अंतर ५ सेमीपेक्षा अधिक असू नये
● मुलांच्या बॅग्ज, पाणी बॉटल्स, जेवणाचे डबे ठेवण्यासाठी बसमध्ये स्वतंत्र व्यवस्था आवश्यक
● प्रत्येक बसमध्ये विद्यार्थ्यांचे नाव, वर्ग, रक्तगट, बसमध्ये चढण्याचे व उतरण्याचे ठिकाण दर्शविणारे विवरणपत्रक असावे
● प्रत्येक बसमध्ये शाळेचे नाव, मार्ग क्रमांक लिहिलेले दोन फलक बसविणे आवश्यक; फलक बसच्या समोरील बाजूस असावेत
● बसच्या प्रवेश मार्गावर पायऱ्यांवर हाताने धरावयाचे हँडल बसविणे सक्तीचे; बसमध्ये निर्धारित क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थी नसावेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: गडचिरोलीत पुरामुळे अडकलेले विद्यार्थी प्रशासनाच्या तत्परतेने परीक्षेसाठी दिल्ली रवाना

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT