वाचन अभियान
वाचन अभियान Sakal
महाराष्ट्र

विद्यार्थ्यांना लेखन, वाचन, अंकगणित जमेना! गुणवत्तावाढीसाठी आता ‘सेतू’चा आधार

तात्या लांडगे

सोलापूर : कोरोनामुळे दोन वर्षे शाळा बंद राहिल्याने चिमुकल्यांच्या विशेषत: पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर मोठा परिणाम झाला आहे. त्या वर्गातील जवळपास ५८ टक्के मुले लेखन, वाचन, अंकगणितात पिछाडीवर असल्याची स्थिती आहे. आता सेतू अभ्यासक्रमाच्या माध्यमातून दुसरी ते दहावीतील मुलांच्या गुणवत्तावाढीचा प्लॅन जिल्हा शिक्षण आणि प्रशिक्षण संस्थेने (डाएट) तयार केला आहे. त्याअंतर्गत शिक्षकांनाही प्रशिक्षित केले जाणार आहे.

जिल्ह्यात पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या पाच लाखांपर्यंत आहे. कोरोनामुळे अंगणवाड्यांमधील तब्बल ८० हजार विद्यार्थी थेट दुसरी-तिसरीत गेले आहेत. प्रत्येक इयत्तेतील विद्यार्थी दोन वर्षांनी पुढे गेला आहे. त्यांची गुणवत्ता वाढावी म्हणून सेतू अभ्यासक्रमाअंतर्गत शाळा सुरु झाल्यानंतर पहिल्या आठवड्यात पूर्व चाचणी तर एका महिन्यानंतर उत्तर चाचणी घेणे अपेक्षित आहे. त्या दोन्ही चाचण्यांची पडताळणी करून कोणत्या वर्गातील विद्यार्थी लेखन, वाचन की अंकगणितात पिछाडीवर आहेत, याचा निष्कर्ष काढला जाणार आहे. तत्पूर्वी, शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यास मागील इयत्तेतील मूलभूत बाबींचे शिक्षण देत चालू वर्गातील अभ्यासक्रम शिकवावा, असे डाएटने स्पष्ट केले आहे. प्रत्येक तालुक्यातील गटशिक्षणाधिकारी, विस्ताराधिकारी, विशेषतज्ज्ञ, विषय शिक्षकांच्या माध्यमातून ४० मुलांचा सर्व्हे केला जाणार आहे. त्यांची पूर्व व उत्तर चाचणी घेऊन विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा अंदाज घेतला जाणार आहे. त्यानंतर पुढील उपाययोजना केल्या जातील, असेही ‘डाएट’ने स्पष्ट केले आहे.

महिनाभरात मुले वाचायला शिकतील

पहिली ते तिसरीतील विद्यार्थ्यांना लेखन, वाचन, अंकगणित यावे म्हणून पहिल्यांदा शिक्षकांना तालुकानिहाय प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याअंतर्गत किरण बाबर हे शिक्षक १९ खडीसंदर्भात शिक्षकांना मार्गदर्शन करतील. तर मुलांना गणिती क्रिया याव्यात म्हणून श्री. कन्नाळ हे प्रशिक्षण देतील. ११ तालुके आणि सोलापूर शहरातील शिक्षकांना २४ दिवस (प्रत्येक तालुक्यासाठी दोन सत्रात दोन दिवस) प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्या शिक्षकांच्या माध्यमातून पहिली ते तिसरीतील चिमुकली महिनाभरात वाचायला शिकतील, असा विश्वास ‘डाएट’ने व्यक्त केला आहे.

‘सेतू’च्या झेरॉक्ससाठी पैसे द्यायचे कोणी?

शालेय शिक्षण विभागाने (राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद) विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी सेतू अभ्यासक्रमाअंतर्गत मोबाईलवरील ‘पीडीएफ’ फाईलचे झेरॉक्स काढून विद्यार्थ्यांची पूर्व व उत्तर चाचणी घ्यावी, असे सूचविले आहे. पण, झेरॉक्सचे पैसे द्यायचे कोणी, कुठून असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे अनेक शाळांनी (वर्ग) सेतू अभ्यासक्रमाची पूर्व चाचणीच घेतलेली नाही, असे चित्र आहे.

शिक्षकांना प्रशिक्षण देऊन केले जाईल सक्षम

‘डाएट’तर्फे पहिली ते तिसरीच्या वर्गावरील सर्व शिक्षकांना भाषा व गणित या विषयांचे मूलभूत प्रशिक्षण दिले जाणार आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून आयोजित विविध विषयांच्या प्रशिक्षणातून शिक्षकांचे सक्षमीकरण होईल आणि त्यातून मुलांची प्रगती साध्य होणार आहे.

- शशिकांत शिंदे, अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Fact Check: पूजेच्या साहित्यावर जीएसटी सूट देण्यास काँग्रेसने विरोध नाही, फेक पोस्ट होताहेत व्हायरल

Deepfake Detector : आता डीपफेक व्हिडिओ ओळखणं झालं सोपं; 'ओपन एआय' कंपनीने लाँच केलं नवीन टूल

Latest Marathi News Live Update : 'अशा बिनकामाच्या गोष्टींवर मोदी नक्कीच बोलतील..'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्याबाबत प्रियांका गांधींची प्रतिक्रिया

राज्यातील चार शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर; कधी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT