students loans esakal
महाराष्ट्र बातम्या

Student Loans : राज्यात अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना ३० कोटी कर्ज

मुस्लिम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन, पारशी व ज्यू अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज दिले जाते

सकाळ वृत्तसेवा

छत्रपती संभाजीनगर - शासनाच्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम, शैक्षणिक कर्ज योजना व मौलाना आझाद शैक्षणिक कर्ज योजनेतून योजनेतून राज्यातील अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज दिले जाते.

या कर्ज योजनेतून १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या शैक्षणिक वर्षासाठी राज्यातून २ हजार ९४२ विद्यार्थ्यांना ३० कोटी ६३ लाख ९६ हजार ६४० रुपये कर्जाचे वाटप करण्यात आले.

आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या अल्पसंख्यांक मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन, पारशी व ज्यू यांच्या सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी २७ सप्टेंबर २००० ला मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली होती.

त्या अंतर्गत सामाजिक व आर्थिक उन्नतीसाठी विविध कर्ज योजना, प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आल्या होत्या. अल्पसंख्याक समाजातील व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाकडून ५ लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज दिले जाते.

कोण आहे पात्र?

ही शिष्यवृत्ती मुस्लीम, ख्रिश्चन, बौद्ध, शीख, जैन, पारशी व ज्यू या समाजांचा अल्पसंख्याक समाजातील दहावी आणि बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमाचे शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र आहेत.

पात्र अभ्यासक्रम-

आयटीआय पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, मेडिकल, नर्सिंग, फॅशन डिझायनिंग, टुरिझम, पत्रकारिता, मास मीडिया, ॲनिमेशन, हॉटेल मॅनेजेमेंट आदी अभ्यासक्रम.असे मिळेल विद्यार्थ्यांना कर्ज

केंद्राच्या डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम शैक्षणिक कर्ज योजनेतून पाच लाख रुपयांपर्यंत ३ टक्के व्याजाने शैक्षणिक कर्ज मिळू शकते. पुढील पाच वर्षांत कर्जफेड करणे अपेक्षित असते.

जो कर्ज मागायला येतो तो स्वखुशीने येत नाही. आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे व उच्चशिक्षण घेण्याची प्रबळ इच्छा असल्यामुळे शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी पालक येतात. राज्यात २ हजार ९४२ लाभार्थ्यांना आम्ही मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळातर्फे शैक्षणिक कर्जाचे वाटप केले.

- शेख जहीर, जिल्हा व्यवस्थापक, मौलाना आझाद अल्पंख्याक आर्थिक विकास महामंडळ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Narendra Modi: ‘आरजेडीने’ विकासकामे बंद पाडली; पंतप्रधान मोदी, इंडिया आघाडी अनैसर्गिक

Latest Marathi News Live Update : इस्लामपूरचं नाव बदललं! आजपासून ईश्वरपूर

Kartik Purnima 2025: कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी राशीनुसार करा 'या' वस्तूचे दान आणि ग्रहदोषातून मुक्ती मिळवा!

भारतीय महिला क्रिकेटपटूंसाठी बॉलिवूड अभिनेत्रीने तिची संपूर्ण ब्रँड एंडोर्समेंट रक्कम दान केली होती, तुम्हाला माहित्येय का कोण आहे ती?

Shivendraraje Bhosale: आगामी निवडणूकीत कसे लढायचे, याचा निर्णय योग्‍यवेळी: मंत्री शिवेंद्रराजे भाेसले; साताऱ्यातील मेळाव्यात नेमकं काय घडलं..

SCROLL FOR NEXT