परीक्षा sakal
महाराष्ट्र बातम्या

विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा! पाचवी, आठवीची 9 फेब्रुवारीला शिष्यवृत्ती परीक्षा; ‘या’ संकेतस्थळावर करता येईल 31 डिसेंबरपर्यंत नोंदणी; परीक्षा किती गुणांची, प्रश्न किती?

शासनमान्य शाळांमधून २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेत प्रविष्ट होण्यासाठी व इयत्ता आठवीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : शासनमान्य शाळांमधून २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पाचवीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षेत प्रविष्ट होण्यासाठी व इयत्ता आठवीत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांमधील पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी १७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी करता येणार आहे. या विद्यार्थ्यांची परीक्षा ९ फेब्रुवारी रोजी होईल, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने जाहीर केले आहे.

परीक्षेला पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या दोन्ही प्रश्‍नपत्रिकेतील सर्व प्रश्‍न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाचे असणार आहेत. प्रत्येक पेपरसाठी ए, बी, सी व डी अशा विविध संचांच्या प्रश्‍नपत्रिका असणार आहेत. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी (इयत्ता पाचवी) उत्तरांच्या चार पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक असणे जरुरी आहे. तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठीच्या (इयत्ता आठवी) प्रत्येक पेपरमध्ये कमाल २० टक्के प्रश्‍नांच्या बाबतीत उत्तरांच्या चारपैकी दोन पर्याय अचूक असावेत. ते दोन्ही पर्याय विद्यार्थ्यांनी नोंदविणे आवश्यक असणार आहे. मराठी, उर्दू, हिंदी, गुजराती, इंग्रजी, तेलुगु व कन्नड या सातपैकी कोणत्याही एका माध्यमातून विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार आहे.

परीक्षेसाठी ‘या’ संकेतस्थळावर करा नोंदणी

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना www.mscepune.in व http://puppssmsce.in या संकेतस्थळावरून विलंब शुल्कासह १५ डिसेंबरपर्यंत तर २३ डिसेंबरपर्यंत अतिविलंब शुल्कासह नोंदणी करता येणार आहे. तसेच अति विशेष विलंब शुल्कासह ३१ डिसेंबरपर्यंत नोंदणी करण्याची मुदत देण्यात आली आहे. अर्जदार विद्यार्थ्यांची ९ फेब्रुवारी २०२५ रोजी सर्वच जिल्ह्यांत एकाचवेळी परीक्षा होणार आहे.

अशी होणार परीक्षा

पहिला पेपर

  • प्रथम भाषा : २५ प्रश्‍न व ५० गुण

  • गणित : ५० प्रश्‍न व १०० गुण

  • वेळ : सकाळी ११ ते दुपारी १२.३० पर्यंत

---------------------------------------------------------------------------

दुसरा पेपर

  • तृतीय भाषा : २५ प्रश्‍न व ५० गुण

  • बुद्धिमत्ता चाचणी : ५० प्रश्‍न व १०० गुण

  • वेळ : दुपारी दोन ते साडेतीनपर्यंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT